(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'83'च्या यशानंतर आदिनाथ कोठारेची पुन्हा बॉलिवूड झेप, रोहन सिप्पीच्या आगामी चित्रपटात झळकणार!
अभिनेता आदिनाथ कोठारेने "83" या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. आता त्याचा दुसरा बॉलिवूड चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Aadinath Kothare : बॉलिवूड चित्रपट "83" प्रेक्षकांना प्रचंड आवडला. या चित्रपटात सगळ्यांच्याच भूमिका एकापेक्षा एक होत्या. अभिनेता आदिनाथ कोठारेने (Aadinath Kothare ) "83" या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. आता लवकरच तो दिग्दर्शक रमेश सिप्पीच्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. त्यामुळे आदिनाथ आता आणखी कोणत्या नव्या चित्रपटात दिसणार याबाबत चाहते उत्सुक आहेत.
रिपोर्टसनुसार, काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर आदिनाथचा बॉलिवूड दिग्दर्शक रोहन सिप्पीबरोबर (Rohan Sippy) फोटो दिसला. या फोटोने चाहत्यांची उत्सुकता मात्र जास्तच वाढवली आहे.
या संदर्भात आदिनाथ कोठारेने आपली प्रतिक्रिया दिली आहे. आदिनाथ म्हणाला, "होय, मी रोहन सिप्पीच्या नव्या प्रोजेक्टमध्ये तुम्हांला दिसेन. रोहन सिप्पी माझ्या आवडत्या बॉलिवूड दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्यामुळे रोहन सिप्पीच्या प्रोजेक्टचा हिस्सा होणं, नक्कीच सुखद म्हणावे लागेल. सध्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. यंदा हे प्रोजेक्ट रसिकांच्या भेटीला येईल.”
आदिनाथच्या प्रतिक्रियेतून हे तर स्पष्ट झालं की तो रोहन सिप्पीबरोबर एका नवीन प्रोजेक्टवर काम करतोय. पण, या चित्रपटाचे नाव तसेच या चित्रपटातील स्टारकास्ट याबाबत अजून कोणताही खुलासा करण्यात आला नाही.
यापूर्वी आदिनाथ कोठारे कबीर खान (kabir khan) दिग्दर्शित "83" ह्या बिग बजेट मल्टिस्टारर सिनेमात दिसला. तसेच, नागेश कुकनूर दिग्दर्शित सिटी ऑफ ड्रिम्स (City of dreams) या वेबसीरीजमधून त्याने डिजीटल विश्वातही पदार्पण केले.
महत्वाच्या बातम्या :
- Panghrun : 'पांघरूण’च्या निमित्ताने रंगणार सांगितिक मैफल
- Aai Kuthe Kay Karte : आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधतीच्या स्वप्नांना मिळणार नवी भरारी ; रेकॉर्ड करणार पहिलं गाणं
- Rinku Rajguru : रिंकूचं 'या' अभिनेत्याशी अफेअर ? 'स्पेशल डिनर डेट'मुळे रंगल्या चर्चा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha