दिग्गज अभिनेत्रीला पुन्हा कॅन्सरचं निदान, उपचारादरम्यान गळणारे केस कापायला चिमुकल्या नातवंडांची मदत, मन हेलावणारा क्षण
Actress Nafisa Ali Stage 4 Cancer Treatment: स्टेज 4 पेरिटोनियल कॅन्सरमुळे नफीसा अली सध्या केमोथेरपी घेत आहेत. कॅन्सरची ट्रिटमेंट घेत असल्यामुळे नफीसा अली यांचे केस गळायला सुरुवात झाली आहे.

Actress Nafisa Ali Stage 4 Cancer Treatment: ज्येष्ठ अभिनेत्री आणि राजकारणी नफीसा अली सोधी (Nafisa Ali), ज्या स्टेज 4 पेरिटोनियल कॅन्सरशी (Peritoneal Carcinoma) झुंज देत आहेत, त्यांनी केमोथेरपी सुरू केली आहे. कॅन्सरची ट्रिटमेंट, केमोथेरपीचा अनुभव याबाबत अभिनेत्री त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन चाहत्यांना माहिती देत आहेत. नफीसा अली यांनी इंस्टाग्रामवर हसतमुख सेल्फी शेअर केला आणि त्याला 'पॉजिटिव एनर्जी' असं कॅप्शन दिले. त्यानंतर लगेचच, अभिनेत्री दिया मिर्झाने हार्ट इमोजीसह टिप्पणी केली, तर इतर अनेक फॉलोअर्सनी त्यांच्यासाठी प्रार्थना करुन त्यांना शुभेच्छा पाठवल्या. पण, चाहत्यांचं खरं मन हेलावलं ते नफीसा अली यांनी शेअर केलेल्या आपल्या नातवांसोबतच्या एका व्हिडीओमुळे...
View this post on Instagram
स्टेज 4 पेरिटोनियल कॅन्सरमुळे नफीसा अली सध्या केमोथेरपी घेत आहेत. कॅन्सरची ट्रिटमेंट घेत असल्यामुळे नफीसा अली यांचे केस गळायला सुरुवात झाली आहे. खरं तर डोक्यावरचे केस म्हणजे, स्त्रिचं सौंदर्य... पण, तेच केस गळणं म्हणजे, अत्यंत दुःखद. पण, नफिसा यांनी आपल्या आजारपणाचं सत्य स्विकारुन, उपचारांना मोठ्या धीरानं समोऱ्या जात असल्याचं पाहायला मिळत आहे.
नफीसा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कॅन्सरवरच्या उपचारांमुळे नफीसा त्यांचे गळणारे केस काढत असल्याचं दिसतंय. तर यासाठी त्यांना त्यांची नातवंड मदत करत असल्याचं पाहायला मिळत आहे. चिमुकली नातवंड आपल्या चिमुकल्या हातांनी आपल्या आईचे केस कापत असल्याचं दिसतंय. या व्हिडीओला नफीसा यांनी डोळे पाणावणारं कॅप्शनही दिलं आहे. "अखेर माझ्या नातवंडांनी केस गळतीत माझी मदत केली...", असं कॅप्शन अभिनेत्रीनं दिलंय.
दरम्यान, नफीसा अलीला नोव्हेंबर 2018 मध्ये पहिल्यांदा स्टेज 3 पेरिटोनियल आणि ओव्हेरियन कॅन्सर असल्याचं निदान झालं. 2019 पर्यंत तिनं धैर्यानं जाहीर केलं की, तिनं या आजारावर मात केली आहे. अभिनेत्रीनं अलिकडेच खुलासा केला की, कर्करोग पुन्हा आला आहे आणि ती पुन्हा एकदा उपचार सुरू करणार आहे.


















