एक्स्प्लोर

रुपेरी पडद्यानंतर सयाजी शिंदे थिएटर गाजवणार, पुन्हा धुरळा उडणार, 22 वर्षांनी मराठी रंगभूमीवर पुन्हा पदार्पण

Sayaji Shindes Upcoming Marathi Natak : सयाजी शिंदे यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदी, साऊथ सिनेसृष्टीतही आपला वेगळा ठसा उमटवला आहे. अशातच आता ते 22 वर्षांनी मराठी रंगभूमी गाजवणार आहेत.

Sayaji Shindes Upcoming Marathi Natak : मनोरंजनविश्वात आपला ठसा उमटवत काहीतरी  वेगळं देऊ पाहणारे कलाकार एकत्र आले की, काहीतरी खास पाहायला मिळणार याची खात्री असते. रंगभूमीवर वैविध्यपूर्ण नाटकांची रेलचेल नव्या वर्षात बघायला मिळणार असताना एका सशक्त नाटकाच्या निमित्तानं मराठी रंगभूमीवर दोन अवलिया रंगकर्मी एकत्र आले आहेत. अभिनेते सयाजी शिंदे (Marathi Actor Sayaji Shinde) यांनी आपल्या सकस कलाकृतींनी आणि अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदी, साऊथ  सिनेसृष्टीतही आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आपल्या अंगभूत असलेल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करत डबिंग आर्टिस्ट, अभिनय, दिग्दर्शन ते नाट्यनिर्माता अशी चौफेर मुशाफिरी करत अजित भुरे  यांनी आपला वेगळेपणा दाखवून दिला आहे. या दोन कलासंपन्न कलाकारांना या नाटकाने एकत्र आणले आहे. 

सुमुख चित्र आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् च्या सहकार्याने अनेक नव्या नाट्यकृती रंगभूंमीवर येतायेत. या नव्या नाटकासाठी  या दोन दिग्गज मान्यवरांना एकत्र आणण्याची किमया त्यांनी साधली आहे. या निर्मिती संस्थेचं हे तिसरं नाट्यपुष्प आहे. या  दोन अनुभवी कलाकारांच्या एकत्र येण्याने हे नवं नाटक कोणतं? याची उत्सुकता ही  शिगेला पोहचली आहे. या दोन अवलिया कलाकारां व्यतिरिक्त या नाटकात कोण आहे? या नाटकाचं नाव काय? या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात आहे. लवकरचं या नाटकाचा शुभारंभ  केला जाणार आहे. या निमित्तानं अभिनेते सयाजी शिंदे 22 वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन करणार आहेत, तर नाट्यनिर्माते अजित भुरे 6 वर्षांनी पुन्हा दिग्दर्शनाकडे वळले आहेत. कलासंपन्न अशा दोन कलाकारांची  नाट्यकृती प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल.

रुपेरी पडद्यानंतर सयाजी शिंदे थिएटर गाजवणार, पुन्हा धुरळा उडणार, 22 वर्षांनी मराठी रंगभूमीवर पुन्हा पदार्पण

अभिनेते सयाजी शिंदे सांगतात, "नाटकात काम करण्याच्या हेतूनं मी  मुंबईत आलो होतो, पुढे चित्रपटांमध्ये व्यस्त झालो. आता  पुन्हा एकदा रंगभूमीवर काम करता येणार याचा आनंद आहेच. दर 5 वर्षांनी माणूस आणि गोष्टी बदलतात असं म्हणतात. या बदलाला या नव्या नाट्यकृतींच्या माध्यमातून जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. 'जुनं ते सोनं' असं म्हणतात, याच जुन्या विषयाचा नव्या अंगानं आढाव घेणारं काहीतरी करण्याची इच्छा असताना या नाट्यकृतीची विचारणा झाली. अजित भुरे सारखा कलासक्त माणूस ज्याच्यासोबत मी प्रायोगिक काम केलं. आता या नाटकाच्या निमित्ताने व्यावसायिक काम करताना त्याच्याकडून नवं काहीतरी  शिकायला मिळणार. कलाकारापेक्षा माणूस महत्त्वाचा असं म्हणणाऱ्या अजित आणि मी मनोरंजनाचा समृद्ध असा काळ पहिला आहे. त्यामुळे याच समृद्धतेचा अनुभव त्याच्या सोबतीने नाट्यरसिकांना पुन्हा देता येणार हे मला खूप महत्त्वाचं  वाटतं."  

सयाजी शिंदेंना झुलवा नाटकात पाहाणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता.अशा जबरदस्त कलाकारासोबत प्रत्यक्ष काम करण्याची संधी लवकरच प्राप्त होते आहे. मला खात्री आहे की ह्यामुळे मी सुद्धा एक कलाकार म्हणून समृद्ध होईन. सयाजी शिंदे एका महत्वाच्या नाटकात भूमिका करत आहेत. मराठी नाट्यसृष्टीत माइलस्टोन ठरलेली ही कलाकृती आहे.आजच्या काळात  या नाटकाला भिडणं आव्हानात्मक वाटलं आणि सुमुख चित्र ह्या संस्थेच्या पुढाकाराने ते जुळून आलं. त्या विषयी मला आनंद असल्याचे अजित भुरे यांनी बोलताना सांगितले. 

आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज विविध क्षेत्रात यशस्वी पद्धतीने कार्यरत असून आता ही कंपनी 'सुमुख चित्र' च्या माध्यमातून नाट्यक्षेत्रात काम करते आहे. सुमुख चित्रचे कार्यकारी निर्माते निखिल जाधव सांगतात की,अभिरुचीसंपन्न कलाकृती नाट्य रसिकांसाठी आणण्याचा आमचा मानस असून अनुभवी आणि दिग्ग्ज कलावंतांची ही नवी नाट्यकृती नाट्यरसिकांसाठी दमदार मेजवानी असणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

FIR Against Shreyas Talpade: अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का

व्हिडीओ

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
Embed widget