हास्यजत्रेचा गौरव मोरे 'जयभीम पँथर'मध्ये झळकणार, यंदाच्या एप्रिलमध्ये 'संघर्ष' मोठ्या पडद्यावर!
या वर्षाच्या एप्रिल महिन्यात जयभीम पँथर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार असून गौरव मोरेदेखील यात झळकणार आहे.
मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला गौरव मोरे आता लवकरच आणखी एका मोठ्या चित्रपटात दिसणार आहे. या वर्षाच्या एप्रिल महिन्यात 'जयभीम पँथर-एक संघर्ष' हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात गौरव मोरे दिसणार आहे. 1 जानेवारी रोजी त्याने या चित्रपटाचे पोस्टर आपल्या इन्स्टाग्रामच्या खात्यावर पोस्ट केले आहे.
येत्या एप्रिल महिन्यात चित्रपट प्रदर्शित होणार?
'जयभीम पँथर-एक संघर्ष' या चित्रपटावर गेल्या अनेक दिवसांपासून काम चालू आहे. या चित्रपटात गौरव मोरे हा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आज या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये या चित्रपटाचे एक मोशन पोस्टर लॉन्च करण्यात आले होते. तेव्हापासून या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटात नेमके काय असणार? असे विचारले जात आहे. गौरव मोरोसोबतच इतरही अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. गौरव मोरेने पोस्ट केलेल्या पोस्टरनुसार हा चित्रपट एप्रिल महिन्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल.
मनातील संघर्ष पडद्यावर पाहायला नक्की या
हे पोस्टर पोस्ट करताना गौरवने एक समर्पक कॅप्शन दिले आहे. 'नवीन वर्षात घेऊन येत आहोत आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट. प्रत्येक माणसाच्या मनातील संघर्ष पडद्यावर पाहायला नक्की या...! एप्रिलमध्ये आपल्या जवळच्या चित्रपटगृहात,' असं गौरवने आपल्या इन्स्टाग्रामच्या पोस्टवर म्हटलं आहे.
निशांत धापसे यांचे दिग्दर्शन
या चित्रपटाचे दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांनी केले आहे. चित्रपटासाठी लिखाणही त्यांनीच केलंय. तर रामभाऊ तायडे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी या चित्रपटातील गीत गायलेली आहेत. नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शनद्वारे या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.
View this post on Instagram
2023 मध्ये चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म गुरु विशुद्धानंद बोधी यांच्या नेतृत्वाखाली अशोक विजयादशमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे 'जय भीम पँथर' या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले होते. त्यामुळेच या चित्रपटात नेमके काय असणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
यंदाही बॉलिवुडपेक्षा साऊथच ठरणार वरचढ, 'हे' दमदार 5 चित्रपट सलमान, शाहरुखलाही टाकणार मागे?