एक्स्प्लोर
भारत गणेशपुरे पुन्हा बोहल्यावर चढणार!
'चला हवा येऊ द्या'मधील श्रेया बुगडेने भारत गणेशपुरे पुन्हा बोहल्यावर चढणार असल्याचा फोटो शेअर केला आणि गणेशपुरे यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली.
![भारत गणेशपुरे पुन्हा बोहल्यावर चढणार! Actor Bharat Ganeshpure to tie the knot again भारत गणेशपुरे पुन्हा बोहल्यावर चढणार!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/09101603/Bharat_Ganeshpure.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : आपल्या महाराष्ट्राचे लाडके सरपंच...जगभर हास्याची हवा करुन आलेले, विदर्भाचे ब्रॅंड अॅम्बेसेडर भारत गणेशपुरे यांचं आज लग्न आहे. काय म्हणताय भारतचं लग्न झालंय? 18 वर्षांपूर्वी? मग भारत आता कोणाशी लग्न करत आहेत?
'चला हवा येऊ द्या'मधील श्रेया बुगडेने भारत गणेशपुरे पुन्हा बोहल्यावर चढणार असल्याचा फोटो शेअर केला आणि गणेशपुरे यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली. भारत कोणाशी लग्न करणार, वधू कोण याबद्दल तर्क लढवण्याआधीच स्पष्ट करतो, ते आपल्या पत्नीसोबतच पुन्हा लगीनगाठ बांधणार आहे, बरं का..
त्याचं झालं असं की, 'चला हवा येऊ द्या'ची सगळी टीम जगप्रवासाला निघाली. सगळं आलबेल असताना भारत गणेशपुरे यांना सौम्य अटॅक येऊन गेला. भारत यांचा ज्योतिषशास्त्रावर फार विश्वास आहे. त्यांनी तातडीने हात दाखवला. तर गुरुजी म्हणाले, 'तुमची लगीन गाठ अंमळ सैल होतेय की काय अस वाटतं, घट्ट करा. झालं, भारत मायदेशात परतले आणि थेट मुहूर्त काढला.
अहो कधीचा म्हणून काय विचारताय..आजचा. होय. तब्बल 18 वर्षांनी भारत आपल्या पत्नीसोबत पुन्हा विवाहबद्ध होत आहेत. वहिनी अमरावतीच्याच आहेत. आता संपूर्ण लग्नविधी पुन्हा होणार आहेत, म्हणूनच कालच या दाम्पत्याची हळद झाली. श्रेया बुगडेने फोटोही शेअर केला.
आज सायंकाळी भारत आणि आपल्या वहिनीची गाठ अधिक घट्ट होणार आहे. एकदा लग्न झालं की भारत पुन्हा जगप्रवासाला निघतील हे ओघाने आलंच. हं...पण आता यावेळी 'चला हवा येऊ द्या'च्या टीमला एक तिकीट एक्स्ट्रा बुक करायला लागेल हे तुम्हाला काय आम्ही सांगायला हवं काय?
![भारत गणेशपुरे पुन्हा बोहल्यावर चढणार!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/09101808/Shreya_Bharat.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
नाशिक
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)