Abhishek Aishwarya Viral Bathtub Photos: ऐश्वर्या -अभिषेकचे बाथटबमधील फोटो व्हायरल; सोशल मीडियावर खळबळ
Abhishek Aishwarya Viral Bathtub Photos: सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन दोघांचे खासगी क्षण समोर आले आहेत. दोघेही बाथटबमध्ये अत्यंत रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.
Abhishek Bachchan Aishwarya Rai Bathtub Photos: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचं (Bollywood) मोस्ट फेवरेट कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्य रंगल्या होत्या. पण, त्यानंतर बऱ्याचदा दोघे एकत्र स्पॉट झाले, तेव्हापासून या चर्चांना काही काळासाठी तरी पूर्णविराम लागला आहे. पण, तसं पाहायला गेलं तर, हे कपल कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतं. असंच काहीसं आता झालं आहे. अभिषेक (Abhishek Bachchan) ऐश्वर्या (Aishwarya Rai) सध्या एका वेगळ्या कारणामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. दोघांचे काही कोझी फोटो व्हायरल होत आहेत. जे व्हायरल झाल्यामुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन दोघांचे खासगी क्षण समोर आले आहेत. दोघेही बाथटबमध्ये अत्यंत रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. दोघांचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे जोरदार चर्चा सुरू आहेत. पण, काहींनी हे फोटो खरे की, खोटे असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
बाथटबमध्ये कोझी होताना दिसते अभिषेक-ऐश्वर्या
aishwarya_raiii नावाच्या इंस्टाग्राम हँडलवर दोघांचे फोटो शेअर केले गेले आहेत. या फोटोंमध्ये एका बाथटबमध्ये दोघेही एकमेकांसोबत काही खासगी क्षण घालवत असल्याचं पाहायला मिळत आहे. दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत आहेत. पण, सोशल मीडियावर दोघांचे खासगी फोटो शेअर केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. तसेच, हे फोटो पाहून सारे आश्चर्य व्यक्त करत आहेत. कारण, दोघांनी एवढे खासगी फोटो पहिल्यांदाच शेअर केले आहेत.
View this post on Instagram
एकूण तीन फोटो आहेत, जे फारच रोमँटिक आहे. तुम्हीही हे फोटो पाहून हैराण झाला असाल तर, अजिबात गंभीर होऊ नका. कारण व्हायरल होणारे हे फोटो अजिबात खरे नाहीत. हे फोटो खोटे आहेत. AI किंवा फोटोशॉप वापरुन हे फोटो तयार करण्यात आले आहेत. तसेच, इन्स्टाग्राम हँडलवरच्या ज्या अकाउंटवरुन हे फोटो शेअर करण्यात आले आहेत, ते अकाउंटही ऐश्वर्या रायचं ऑफिशिअल अकाउंट नाही. या फोटोंमुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. नेटकरी पुरते हैराण झाले आहेत.
नेटकऱ्यांचं म्हणणं काय?
सध्या व्हायरल होणाऱ्या फोटोवर कमेंट करताना एका व्यक्तीनं लिहिलं की, "व्वा... किती सुंदर आहेत दोघे..." आणखी एका युजरनं लिहिलंय की, "असं तर मी पहिल्यांदाच पाहतोय..", "बहुत ज्यादा हॉट", असंही एका युजरनं लिहिलं आहे. याव्यतिरिक्त हार्ट आणि फायर इमोजी वापरुन अनेकांनी कमेंट केल्या आहेत. दरम्यान, अभिषेक बच्चन किंवा ऐश्वर्या राय दोघांपैकी कुणीच या व्हायरल फोटोंबाबात कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :