एक्स्प्लोर

Aadesh Bandekar On Digambar Naik Allegations: 'दुसऱ्याकडे बोट दाखवताना चार बोटं स्वत:कडेच, आत्मपरिक्षण करावं...'; मराठी अभिनेत्याच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं नाव न घेता सडेतोड उत्तर

Aadesh Bandekar On Digambar Naik Allegations: दिगंबर नाईक यांनी लक्ष्य मालिका आणि मालवणी निर्मात्याबाबत केलेल्या वक्तव्यावर स्वतः आदेश बांदेकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला असून बोलताना मात्र कुणाचंच नाव घेतलेलं नाही.  

Aadesh Bandekar On Digambar Naik Allegations: संघर्ष प्रत्येकाच्याच वाट्याला येतो, आयु्ष्य म्हटलं की, त्यासोबत संघर्ष आलाच. याच संघर्षाबाबत काही दिवसांपूर्वी मराठी सिनेसृष्टीतल्या (Marathi Film Industry) एका अभिनेत्यानं इंडस्ट्रीत त्याच्या वाट्याला आलेल्या संघर्षाबाबत मौन सोडलं. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मराठी अभिनेते दिगंबर नाईक (Marathi Actor Digambar Naik) यांनी अनेक घटनांचा उल्लेख करत खळबळजनक दावे केले. तसेच, रात्री पावणे बाराच्या सुमारास आपल्याला लक्ष्य मालिकेतून (Lakshya Marathi Serial) काढल्याचंही सांगितलं. तसेच, हे सांगताना दिगंबर नाईक यांनी निर्माते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांच्या नावाचा उल्लेख केला. तसेच, पुढे बोलताना मालवणी निर्मात्याला किंवा मालवणी माणसालाच मालवणी माणूस नको असतो. नाहीतर मी किती बिझी राहिलो असतो, असंही म्हटलं. अशातच आता दिगंबर नाईक यांनी लक्ष्य मालिका आणि मालवणी निर्मात्याबाबत केलेल्या वक्तव्यावर स्वतः आदेश बांदेकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला असून बोलताना मात्र कुणाचंच नाव घेतलेलं नाही.  

दिगंबर नाईक नेमकं काय म्हणालेले? (Digambar Naik On Aadesh Bandekar)

मुलाखतीत दिगंबर नाईक 'लक्ष्य' मालिका आणि त्या मालिकेचे निर्माते आदेश बांदेकर यांच्यावर बोलताना म्हणाले की, "आदेश बांदेकर मालवणीच आहे ना... माझा मित्रच आहे तो, रात्री पावणे बारा वाजता मला ज्या मालिकेतून काढलं ती 'लक्ष्य' मालिका त्याचीच होती. तेव्हा चॅनेल हेड श्रावणी देवधर होत्या. त्यांचं मत असं होतं की, हा कॉमेडी करतो, हा गंभीर भूमिका कशी करेल? अर्थात त्यांचं हे मत असू शकतं... पण तेव्हा आदेश बांदेकरांना असं वाटलं नाही का? की हा मालवणी मुलगा आहे आणि मीसुद्धा मालवणी आहे. चला माझ्या मालिकेत याला घेऊया. आता मालवणी मालिकेतच मालवणी लोक नको असतात..."

आदेश बांदेकर नेमकं काय म्हणाले? (Aadesh Bandekar On Digambar Naik)

मराठी अभिनेते आणि निर्माते आदेश बांदेकर म्हणाले की, "हे ईश्वरा सगळ्यांना चांगली बुद्धी दे , सद्बुद्धी दे... आनंद दे. नुकतंच मी सोशल मीडियावर बघितलं, लक्ष्य मालिकेबद्दल कोणीतरी विधान केलं आहे ते पाहिलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या मालिकेत कलावंतांमध्ये जी व्यक्ती कधीच नव्हती. लक्ष्यचे अनेक भाग झाले. ती व्यक्ती त्या मालिकेतच नाही, तर मालिकेतून काढलं असं कसं म्हणता येईल..."

पुढे बोलताना आदेश बांदेकर म्हणालेत की, "मालवणी माणसाला मालवणी माणूस नको असं म्हणत असताना, नम्रपणे सांगावसं वाटतं की, त्या लक्ष्य मालिकेत पाच जणांच्या टीममधला पोलीस कमलेश सावंत हा देवगडचाच, मालवणीच... त्यानं आपल्या अभिनयानं ठसा उमटवलाय... आता तो दृश्यमच्या चित्रिकरणात व्यग्र आहे... असे किती तरी मालवणी कलाकार आहेत, जे रंगदेवतीची सेवा करत आहेत. नावं काढायची झाल्यास कित्येक नावं काढता येतील... मालिकेचा निर्माता मालवणी आहे, मी कुडाळचा, मालवणी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे..."

लक्ष्य मालिकेतून 5 हजारांहून अधिक कलाकरांनी काम केलंय... : आदेश बांदेकर 

"लक्ष्य मालिकेतून 5 हजारांहून अधिक कलाकरांनी काम केलंय... त्यांची यादी काढायची झाली ना तर कितीतरी कलावंत, तंत्रज्ञ मालवणीच आहेत, पण मला असं वाटतं आपण महाराष्ट्रात राहतो, भारताचे नागरिक आहोत, आपण प्रत्येक भागाचा, प्रांताचा आदर केला पाहिजे, कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक कलावंत इथे येतात, उत्तम काम करतायत...", असं आदेश बांदेकर म्हणाले.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aadesh Bandekar (@aadesh_bandekar)

दुसऱ्याकडे बोट दाखवताना चार बोटं स्वत:कडे असतात, आत्मपरिक्षण करावं... : आदेश बांदेकर 

मीसुद्धा इतकी वर्ष अत्यंत मेहनतीनं, प्रामाणिकपणे मनोरंजनाची सेवा करतोय... त्यामुळे उगाच असं काही तरी विधान करणं, त्या विधानातून मालवणी माणसाला, मालवणी माणूस नको... मला यानं काढलं, त्यानं घेतलं नाही... त्यापेक्षा आपण काम करूया... आपल्या कामाचा ठसा उमटवूया... दुसऱ्याकडे बोट दाखवताना चार बोटं स्वत:कडे असतात, आत्मपरिक्षण करावं... मनोरंजनाच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे सेवा करावी...", असं आदेश बांदेकर यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Actor Digamber Naik Reveals Removed From Lakshya Serial: 'रात्री पावणे बारा वाजता मला 'ज्या' मालिकेतून काढलं ती आदेश बांदेकरांचीच...'; मराठी अभिनेत्यानं सांगितला इंडस्ट्रीतला 'तो' धक्कादायक अनुभव

महत्त्वाच्या बातम्या

Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Embed widget