एक्स्प्लोर

Actor Digamber Naik Reveals Removed From Lakshya Serial: 'रात्री पावणे बारा वाजता मला 'ज्या' मालिकेतून काढलं ती आदेश बांदेकरांचीच...'; मराठी अभिनेत्यानं सांगितला इंडस्ट्रीतला 'तो' धक्कादायक अनुभव

Actor Digamber Naik Reveals Removed From Lakshya Serial: एका मालिकेत भूमिका मिळालेली, त्यासाठी तयारीही केलेली, पण अचानक रात्री पावणे बारा वाजता त्या मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचा धक्कादायक अनुभव अभिनेत्यानं शेअर केलाय. 

Actor Digamber Naik Reveals Removed From Lakshya Serial: आयुष्यात स्ट्रगल सर्वांच्याच वाट्याला येतो, मग ते कुणीही असो. कोणत्याही गोष्टीत स्ट्रगल केल्याशिवाय आपण ध्येयापर्यंत पोहोचत नाही. हा फक्त काहींची वाट फारच खडतर असते, तर काहींची तुलनेनं खूप सोपी असते. सेलिब्रिटींच्या (Marathi Celebrity) वाट्याला स्ट्रगल आहेच. अशाच एका मराठीतल्या स्टार अभिनेत्यानं (Marathi Actor) त्याच्या आयुष्यातल्या खडतर प्रवासाबाबत एका मुलाखतीत बोलताना स्पष्ट केलंय. एका मालिकेत भूमिका मिळालेली, त्यासाठी तयारीही केलेली, पण अचानक रात्री पावणे बारा वाजता त्या मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचा धक्कादायक अनुभव अभिनेत्यानं शेअर केलाय. 

मराठी मालिका (Marathi Serial) आणि सिनेमांमधून (Marathi Movie) प्रेक्षकांना खळखळून हसवणारं नाव म्हणजे, दिगंबर नाईक (Actor Digamber Naik). 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) मध्येही ते दिसलेले. मालवणच्या मातीतून आलेल्या अभिनेत्यानं अनेक मराठी नाटकं (Marathi Theatre Play), मालिका (Television Serial) आणि सिनेमांमध्ये काम केलंय. नुकत्याच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अभिनेत्यानं त्याच्या आयुष्यातल्या स्ट्रगलबाबत सांगितलंय. 

अभिनेते दिगंबर नाईक काय म्हणाले? (Digamber Naik On Aadesh Bandekar)

अभिनेते दिगंबर नाईक म्हणालेले की, "एका शोमधून मला रात्री पावणे बारा वाजता काढून टाकलेलं. त्यात हवालदाराची भूमिका साकारायची होती. मी त्या भूमिकेसाठी केसही कापलेले. सगळी तयारी केलेली... अभिनेता म्हणून आपण शिकतच असतो. मी करतो तेच समोरचा करू शकेल असं नाही आणि तो जे करतो, ते मी करूच शकत नाही असंही नाही. एखाद्या मालिकेत घेतलं नाही तर निर्माता सांगतो, चॅनेल नको म्हणालं आणि चॅनेलला विचारल्यानंतर ते सांगतात निर्माते ऐकत नाहीत... याची तर मला आता सवयच झालीय..."

सिनेसृष्टीत आलेल्या धक्कादायक अनुभवाबाबत बोलताना अभिनेता म्हणाला की, "पाच-सात दिवसांनी मला कळलं की, माझ्या जागी कुणीतरी दुसरा काम करतोय. त्याचं मला वाईट वाटलं, 'लक्ष्य' नावाची मालिका होती ती. त्यात मी हवालदाराच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिलेली. 'फू बाई फू'नंतर सेलिब्रिटी असूनही माझा संघर्ष संपलेला नव्हता. मला 'लक्ष्य'मधून काढलं याचं कारण त्यांचं म्हणणं होतं तो 'फू बाई फू' करतो, कॉमेडी करतो. मग तो इकडे वारकरी असलेल्या हवालदाराची भूमिका कसा करेल? मला गरज असताना ती भूमिका मिळाली नव्हती, म्हणून वाईट वाटलं, पण हरकत नाही, असं होत राहतं..."

"मालवणी माणसालाच मालवणी माणूस नको असतो..." : दिगंबर नाईक (Digamber Naik On Lakshya Serial)

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिगंबर नाईक यांना त्यांच्या मालवणी भाषेमुळे पहिला सन्मान कधी मिळाला, असं विचारलं. त्यावर बोलताना दिगंबर नाईक म्हणाले की, "माझ्या कोकणातल्या प्रेक्षकांना वाईट वाटेल, पण मालवणी अभिनेता म्हणून माझा सन्मान असा झालाच नाही. म्हणजे मी 'फू बाई फू' शो करत होतो, तेव्हा तिथे राकेश सारंग होते, ते कोकणातले होते, परीक्षक निर्मिती सावंतसुद्धा कोकणातल्याच, पण त्यांच्यापेक्षा जास्त कौतुक माझं स्वप्नील जोशीनं केलेलं. वाईट वाटेल... पण मी स्पष्टवादी आहे. मला हे बोलताना काही फरक पडत नाही. मला आता 'वस्त्रहरण' नाटक केल्यानंतरच प्रेक्षकांनी मालवणी अभिनेता म्हणून स्वीकारलंय. मालवणी निर्मात्याला किंवा मालवणी माणसालाच मालवणी माणूस नको असतो. नाहीतरी मी कायम कामात व्यग्र राहिलो असतो. आता ज्या मालिका सुरू आहेत, त्याचे निमति मालवणीच आहेत. जर त्या मालवणी माणसाला अभिमान वाटला असता, तर हा मालवणी (दिगंबर नाईक) घरी बसलाच नसता. अभिमानहीं जाऊदे, आत्मीयता जरी वाटली असती, तरी चाललं असतं."

मुलाखतीत बोलताना दिगंबर नाईकांनी 'लक्ष्य' मालिका आणि त्या मालिकेचे निर्माते आदेश बांदेकरांवरही भाष्य केलं. ते म्हणाले की, "आदेश बांदेकर मालवणीच आहे ना... माझा मित्रच आहे तो, रात्री पावणे बारा वाजता मला ज्या मालिकेतून काढलं ती 'लक्ष्य' मालिका त्याचीच होती. तेव्हा चॅनेल हेड श्रावणी देवधर होत्या. त्यांचं मत असं होतं की, हा कॉमेडी करतो, हा गंभीर भूमिका कशी करेल? अर्थात त्यांचं हे मत असू शकतं... पण तेव्हा आदेश बांदेकरांना असं वाटलं नाही का? की हा मालवणी मुलगा आहे आणि मीसुद्धा मालवणी आहे. चला माझ्या मालिकेत याला घेऊया. आता मालवणी मालिकेतच मालवणी लोक नको असतात..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

लग्नाच्या चारच महिन्यांत सूरज चव्हाणच्या घरी पाळणा हलणार? बायकोनं बेबी बंपसह शेअर केला फोटो

महत्त्वाच्या बातम्या

Snake In Shahrukh Khan House: शाहरुख खानचं टेन्शन वाढलं, 'मन्नत' बंगल्यात दोन साप; 8 फूट लांबीची धामण पकडली, पण दुसरा सापडेनाच... नेमकं घडलं काय?
शाहरुख खानचं टेन्शन वाढलं, 'मन्नत' बंगल्यात दोन साप; 8 फूट लांबीची धामण पकडली, पण दुसरा सापडेनाच... नेमकं घडलं काय?
Emraan Hashmi Awarapan 2 Box Office Collection: 45 कोटींच्या सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; तीनच दिवसांत बजेटच्या दुप्पट कमाई, 2026 ची 8 वी ब्लॉकबस्टर फिल्म पाहिलीत?
45 कोटींच्या सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; तीनच दिवसांत बजेटच्या दुप्पट कमाई, 2026 ची 8 वी ब्लॉकबस्टर फिल्म पाहिलीत?
Toxic Actor Yash On Ramayana 4000 Crore Budget: स्वतः प्रोड्यूसर, तरीही 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये रावण साकारतोय साऊथ स्टार यश; प्रभू श्रीरामांची भूमिका का नाही स्विकारली?
स्वतः प्रोड्यूसर, तरीही 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये रावण साकारतोय साऊथ स्टार यश; प्रभू श्रीरामांची भूमिका का नाही स्विकारली?
Actress Hayden Panettiere Passes Away: वाढदिवसाच्या पाच दिवसांआधीच अभिनेत्रीनं घेतला जगाचा निरोप; प्रसिद्ध टेलिव्हिजन शोच्या स्टार अभिनेत्रीचं 36व्या वर्षी निधन
वाढदिवसाच्या पाच दिवसांआधीच अभिनेत्रीनं घेतला जगाचा निरोप; प्रसिद्ध टेलिव्हिजन शोच्या स्टार अभिनेत्रीचं 36व्या वर्षी निधन

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Embed widget