मतदान यंत्र ज्या बंद खोलीमध्ये ठेवतात त्याला स्ट्राँग रूम का म्हणतात?
What is Voting Strongroom : मतदान यंत्र म्हणजेच ईव्हीएम ज्या खोलीमध्ये ठेवतात त्याला स्ट्राँग रूम का म्हणतात?
बीड : राज्यातील लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) तीन टप्पे पार पडले आहेत. चौथा टप्प्यासाठी 13 तारखेला मतदान होणार आहे. ज्या लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे, ते मतदान यंत्र स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेले आहेत, तर ज्या ठिकाणी मतदान होणे बाकी आहे, तिथे प्रशासनाकडून स्ट्राँग रूम उभी केली जात आहे.
मतदानानंतर ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये ठेवतात
मतदान यंत्र ज्या बंद खोलीमध्ये ठेवतात त्या बंद खोलीला का म्हणतात, हे तुम्हाला माहित आहे का? खरंच ही बंद खोली इतकी स्ट्राँग असते का, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. मतदान यंत्र ठेवल्यानंतर स्ट्राँग रूममधली लाईट पूर्णपणे बंद ठेवली जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्ट्राँग रूमची रचना कशी असते, ती कशाप्रकारे मजबूत बनवली जाते, हे सांगणार आहोत.
बीड शहरातील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये बनवलेल्या स्ट्राँग रूमबाबत एबीपी माझाचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासोबत बातचीत केली आहे आणि स्ट्राँग रुमची संकल्पना समजून घेतली आहे.
मतदान यंत्र ज्या खोलीमध्ये ठेवतात त्याला स्ट्राँग रूम का म्हणतात?
स्ट्राँग रूम म्हणजे ती रुम जिथे मतदानानंतर मतपेट्याची सील करुन ठेवल्या जातात. स्ट्राँग रूमची सुरक्षा अत्यंत चोख केलेली असते,
कशी असते स्ट्राँग रूम?
स्ट्राँग रूम अशा प्रकारे बनवण्यात येते की त्याच्या आत एकाच बाजूने प्रवेश करता येतो. स्ट्राँग रूममध्ये दुसरे प्रवेशद्वार असल्यास त्याद्वारे कोणीही स्ट्राँग रूममध्ये प्रवेश करू शकणार नाही, अशी सोय केली जाते. स्ट्राँग रूममधील लाईट पूर्णपणे बंद केली जाते.
ईव्हीएम ठेवल्यानंतर स्ट्राँग रूमचं काय होतं?
ईव्हीएम ठेवल्यानंतर स्ट्राँग रूम सील करून बंद केली जाते, यावेळी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित असतात.
स्ट्राँग रूमची सुरक्षा कशी असते?
स्ट्राँग रूमच्या एन्ट्री पॉइंटवर सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेले असतात. त्यामुळे तेथे येणारा प्रत्येक व्यक्ती कॅमेऱ्यात चित्रित होऊन त्याचा रेकॉर्ड राहतो.
स्ट्राँग रूममध्ये कुणी जाऊ शकतं का?
स्ट्राँग रुम सील केल्यानंतर मतमोजणीच्या दिवशी सकाळीच उघडली जाते. विशेष परिस्थितीत स्ट्राँग रूम उघडली जात असेल तर त्यासाठी उमेदवारांच्या उपस्थितीही महत्त्वाची असते. कोणत्याही संबंधित अधिकाऱ्याला स्ट्राँग रूममध्ये जायचे असेल, तर त्याने सुरक्षा दलांना दिलेल्या लॉग बुकमध्ये त्याच्या भेटीचा वेळ, कालावधी आणि नाव लिहावे लागते.