एक्स्प्लोर

भाजपच्या डिनरला शिवसेनेकडून उद्धव आणि आदित्य ठाकरे

उद्धव ठाकरे मुंबईत दाखल होताच शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक होणार आहे. या बैठकीत भाजपच्या डिनरला शिवसेनेकडून कोण जाणार, याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुंबई : भाजपप्रणित एनडीएच्या  'डिनर डिप्लोमसी'ला शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई हजर राहणार आहेत. राजधानीत दिल्लीत आयोजित स्नेहभोजनाला तिघे जण संध्याकाळी रवाना होणार आहेत. शिवसेनेकडून एनडीएच्या डिनरला कोण जाणार, यावरुन संभ्रमाचं वातावरण होतं. उद्धव ठाकरेंकडून शिवसेना नेत्यांना कोणत्याही सूचना देण्यात न आल्यामुळे डिनरला कोण जाणार, हे निश्चित झालेलं नव्हतं. अखेर सुभाष देसाई यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. मुंबईत 29 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकांचं मतदान झाल्यानंतरच उद्धव ठाकरे सहकुटुंब परदेश दौऱ्यावर गेले होते. मुंबईत आज  दाखल होताच उद्धव आणि आदित्य ठाकरे हे प्रताप सरनाईक यांच्या मुलाच्या लग्नासाठी हजर राहिले. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांची तातडीची बैठक झाली. या बैठकीत डिनरला जाणाऱ्या पाहुण्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. Uddhav Thackeray | पूर्वेश प्रताप सरनाईकांच्या विवाहसोहळ्याला उद्धव ठाकरेंची उपस्थिती भाजपची डिनर डिप्लोमसी लोकसभा निवडणुकांच्या निकालाच्या आधी आलेल्या बहुतांश एक्झिक्ट पोलमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार सत्तेत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 'एबीपी न्यूज'-'नेल्सन' यांनी केलेल्या एक्झिट पोलमध्येही एनडीएला बहुमत मिळत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी एनडीए सर्व घटकपक्षांच्या नेत्यांना डिनरसाठी आमंत्रित केलं आहे. या डिनरला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची माहिती असून यावेळी आगामी रणनीती ठरवली जाण्याची चिन्हं आहेत. NDA Dinner Diplomacy | दिल्लीत एनडीएच्या डिनरला कोण जाणार? भाजपसोबत एनडीएमध्ये असलेले पक्ष भाजपसोबत एनडीएमध्ये 40 लहान-मोठे पक्ष आहेत. यामधील 9 पक्षांचा मोठा प्रभाव आहे. एनडीएमध्ये भाजपनंतर सर्वात मोठा पक्ष शिवसेना आहे. यानंतर जदयू, अण्णा द्रमुक, एआयएडीएमके, पीएमके, डीएमडीके, अकाली दल, लोजप, अपना दल, असम गण परिषद यासह 40 पक्ष एनडीएमध्ये आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...कॅनडाबाबत म्हणाले...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Embed widget