एक्स्प्लोर

WB Election 2021 | ममता 'सिंगूर'चा गड राखणार का?

एकेकाळी डाव्यांचा गड असलेलं हुगळी जिल्ह्यातलं  सिंगूर ममतांनी काबिज केलं. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं इथे सत्ता काबिज केली आहे.

कोलकाता : 2006 साली टाटांच्या नॅनो कारची चर्चा झाली होती. सर्वसामान्यांचं कार घेण्याचं स्वप्न टाटा पूर्ण करणार होते. आणि त्यासाठी त्यांनी जागा निवडली. पश्चिम बंगालच्या सिंगूरची..  पण या निर्णयानं सिंगूरचे शेतकरी मात्र नाराज झाले. त्यांना या प्रकल्पासाठी आपली जमीन द्यायची नव्हती. तत्कालीन डाव्यांच्या सरकारविरोधात यामुळे मोठं आंदोलन सुरू झालं. या आंदोलनाच्या चेहरा होत्या ममता बॅनर्जी.

 2006 मध्ये कम्युनिस्टांकडे 235 आमदार होते आणि टीएमसीचे होते फक्त 35 आमदार.. पण 35 आमदार असलेल्या ममतांनी उपोषण केलं आणि शेतकऱ्यांचा आवाज उठवला. या आंदोलनाला यश आलं. शेवटी टाटांनी या भानगडीला कंटाळून आपला प्रकल्प गुजरातला नेण्याचा निर्णय घेतला. 

दहा वर्षांनंतर लोकांना ही जमीन परत मिळाली, मात्र तोपर्यंत ही जमीन पीकवण्यालायक राहिली नाही. कारण आजही या जमिनीवर फॅक्ट्रीचं सिमेंट, दगड, आणि सामान आजही तसंच पडलंय. सिंगूरच्या शेतकऱ्यांसाठी उपोषण करणाऱ्या ममता बॅनर्जी 2011 साली सत्तेवर आल्या. आज 10 वर्ष झालं त्या मुख्यमंत्री आहेत. मात्र सिंगूर जिथे होतं, जसं होतं, तसंच आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळालं त्यामुळे राजकारणातली समीकरणं बदलली.

एकेकाळी डाव्यांचा गड असलेलं हुगळी जिल्ह्यातलं  सिंगूर ममतांनी काबिज केलं. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं इथे सत्ता काबिज केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ममतांसमोरचं आव्हान वाढलंय. ममतांच्या टीएमसीनं बेचराम मन्ना यांना उमेदवारी दिली आहे. ज्यांनी पहिल्यांदा टाटांच्या नॅनो प्रकल्पाला विरोध केला होता. त्यांच्यासमोर भाजपच्या रबिंद्रनाथ चॅटर्जींचं आहे. तर डाव्यांनी सृजन भट्टाचार्य या युवा चेहऱ्याला संधी दिली आहे. 

सिंगूरवासियांना पुन्हा आपलसं करण्यासाठी अॅग्रो इंडस्ट्रियल पार्कची घोषणा केलीय. दुसरीकडे सीपीएमनं मोठी घोषणा केलीय, 2021 मध्ये आम्ही सत्तेवर येऊ आणि इथे याच फॅक्ट्रीच्या जागी मंत्रीमंडळाची बैठक घेऊ. 
पण गेली 15 वर्ष आश्वासनांच्या राजकारणात सर्वसामान्य सिंगूरवासिय मात्र आजही प्राथमिक गरजांसाठी झगडतायेत. 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मराठवाडा पदवीधर निवडणूक! सतीश चव्हाणांना भाजप घेरणार? जागावाटपावरुन महायुतीत कलगीतुरा रंगणार
मराठवाडा पदवीधर निवडणूक! सतीश चव्हाणांना भाजप घेरणार? जागावाटपावरुन महायुतीत कलगीतुरा रंगणार
Someshwar Karkhana Election : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' बिनविरोध करण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक
अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' बिनविरोध करण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक
Gokul Election: 'म्हणूनच आता हसन मुश्रीफ गोकुळमध्ये पाठिंबा मागत आहेत..' सतेज पाटलांचा पलटवार, म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला..
'म्हणूनच आता हसन मुश्रीफ गोकुळमध्ये पाठिंबा मागत आहेत..' सतेज पाटलांचा पलटवार, म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला..
महायुतीनं गोकुळचं रणशिंग फुंकलं! बैठकीत नेमकं काय घडलं? चंद्रकांत पाटलांनी सांगितला निवडणुकीचा प्लॅन 
महायुतीनं गोकुळचं रणशिंग फुंकलं! बैठकीत नेमकं काय घडलं? चंद्रकांत पाटलांनी सांगितला निवडणुकीचा प्लॅन 

व्हिडीओ

Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha
Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
Satara Bus Accident : कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात सोलापूरच्या बसचा ब्रेक फेल, चालकाच्या प्रसंगावधान राखल्यानं 32 प्रवाशांचा जीव बचावला
कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात बसचा ब्रेक फेल, चालकाच्या दक्षतेमुळं 32 प्रवाशांचा जीव वाचला
Shubman Gill : चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र,गुप्त बैठकीत  निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खलबतं
अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र, संगमनेरमध्ये गुप्त बैठकीत खलबतं
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
AC TV Price Hike : ग्राहकांना मोठा धक्का, 1 ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीनचे दर वाढणार, 2026 मध्ये तिसऱ्यांदा महागाईचा चटका 
1 ऑक्टोबरपासून AC, TV सह वॉशिंग मशीन महागणार,ग्राहकांना वर्षभरात तिसऱ्यांदा महागाईचा धक्का 
Solapur Drought: डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
Embed widget