एक्स्प्लोर

Wadala Vidhan Sabha Constituency Result : वडाळा विधानसभेत कालिदास कोळंबकरच वडाळ्याचे किंगमेकर; श्रद्धा जाधव यांचा दारुण पराभव

Wadala Vidhan Sabha Constituency: वडाळ्यात भाजपचे कालिदास कोळंबकरच किंगमेकर ठरले असून त्यांच्या गळ्यात मतदारांनी सलग नवव्यांदा आमदारकीची माळ घातली आहे. तर, ठाकरे गटाच्या श्रद्धा जाधव यांचा दारुण पराभव झाला आहे.

Wadala Vidhan Sabha Constituency 2024 : भाजपचे कालिदास कोळंबकर सलग नवव्यांदा किंगमेकर ठरले आहेत. कालिदास कोळंबकरांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवत ठाकरेंच्या श्रद्धा जाधव यांचा दारुण पराभव केला आहे. वडाळ्यातील मतदारांनी आपला आमदार म्हणून कालिदास कोळंबकरांची निवड केली आहे. 

यंदाची विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) अत्यंत चुरशीची ठरली, यात काही शंकाच नाही. कारण, गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रानं अभूतपूर्व सत्तासंघर्ष अनुभवला. अशातच आता राज्याच्या चाव्या मतदार राजा कुणाच्या हाती सोपवणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण जनतेनं महायुतीच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्याचं पाहायला मिळत आहे. 

वडाळा विधानसभा (Wadala Vidhan Sabha) मतदारसंघातही यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. वडाळा (Wadala) विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भारतीय जनता पार्टी कालिदास निळकंठ कोळंबकर यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून श्रद्धा श्रीधर जाधव (Shraddha Jadhav) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं. अशातच वडाळ्यातील मतदारांनी आमदारकीची माळ कालिदास कोळंबकरांच्या गळ्यात घातली आहे.  

सलग नवव्यांदा आमदार...

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार कालिदास निळकंठ कोळंबकर यांनी विजय मिळवला होता. वडाळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे कालिदास कोळंबकर हे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडणून आले आहेत. 2019 मध्ये ते भाजपकडून, तर 2014 आणि 2009 मध्ये त्यांनी काँग्रेसकडून वडाळा मतदारसंघात विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीतही मतदारांनी कालिदास कोळंबकर यांनाच आमदार म्हणून निवडलं आहे. 

वडाळा विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार कालिदास कोळंबकर यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी महापौर श्रद्धा जाधव आणि मनसेकडून माजी नगरसेविका स्नेहल जाधव निवडणुकीच्या रिंगणात होत्या. पण, कालिदास कोळंबकर यांनी श्रद्धा जाधव आणि स्नेहल जाधव दोघींचं आव्हान संपुष्टात आणत दणदणित विजय मिळवला. 

2024 च्या विधानसभेच्या रिंगणात कोण आमने-सामने? 

उमेदवाराचं नाव पक्ष
कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) भाजप (महायुती) (विजयी)
श्रद्धा जाधव (Shraddha Jadhav) ठाकरे गट (महाविकास आघाडी)
स्नेहल जाधव (Snehal Jadhav) महाराष्ट्र नवनिर्माण सेना

2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 

भाजपचे कालिदास कोळंबकर यांनी 56,485 मतांसह विजयी
काँग्रेसचे शिवकुमार उदय लाड यांना 25,640 मतांसह दुसऱ्या स्थानी

2014 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 

काँग्रेसकडून असलेल्या कालिदास कोळंबकर यांनी 38,540 मतं मिळवून विजयी

मिहीर कोटेचा यांचा 800 मतांनी पराभव

सलग आठ विजयांसह कालिदास कोळंबकर यांचं वर्चस्व कायम 

कालिदास कोळंबकर यांनी सलग आठ वेळा आमदारकी मिळवली आहे. 1990 ते 2004 या काळात त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक जिंकली होती. कोळंबकर यांनी पहिल्या निवडणुकीत तत्कालीन गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार विलास सावंत यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2006 ते 2014 दरम्यान झालेल्या तीन निवडणुकांमध्ये कोळंबकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला आणि मतदारसंघात आपला दबदबा कायम राखला. 2014 मध्ये कोळंबकर यांनी तत्कालीन भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्यावर 800 मतांनी विजय मिळवला होता. यानंतर कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2019 मध्ये आठव्यांदा निवडणूक जिंकली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वडाळा विधानसभा मतदारसंघात कोळंबकर यांना 56 हजार 485 मतं मिळाली होती. तर , त्यांच्याविरोधात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या शिवकुमार लाड यांना केवळ 25 हजार 640 मतं मिळाली होती.

मतदारसंघाबाबत थोडंसं... 

मुंबई शहर जिल्ह्यातील वडाळा हा मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. पश्चिमेला दादर, वायव्येला माटुंगा आणि दक्षिणेला शिवडी असा परिसर वडाळा विधानसभा मतदारसंघात येतो.  

2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे (भाजप) कालिदास कोळंबकर यांनी 56,485 मतांसह जागा राखली. त्यांचे प्रमुख विरोधक काँग्रेसचे शिवकुमार उदय लाड यांना 25,640 मतं मिळाली. 2014 च्या निवडणुकीत ही जागा काँग्रेससोबत असलेल्या कालिदास कोळंबकर यांनी 38,540 मतं मिळवून जिंकली होती. त्यांचे सर्वात जवळचे प्रतिस्पर्धी भाजपचे मिहिर कोटेचा होते, ज्यांना 37,740 मतं मिळाली होती. 

दरम्यान, यंदाची निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीसाठी अत्यंत चुरशीची मानली जात आहे. राज्यातील जनतेनं अडीच वर्षांत अभूतपूर्व सत्तासंघर्ष पाहिला. त्यामुळे यंदाची निवडणूक प्रत्येकासाठी अस्तित्वाची लढाई आहे. गेल्या काही वर्षांत राज्यातील राजकीय समीकरणात झालेल्या बदलानंतर आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत वडाळा विधानसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा कालिदास कोळंबकरांनी झेंडा फडकावला आहे.   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Modi Win Delhi Election Uncut Speech : आप, केजरीवाल ते अण्णा हजारे, दिल्ली विजयावर मोदींचं भाषण!Narendra Modi on Delhi Election | नारी शक्तीने दिल्लीत भाजपला आशीर्वाद दिला, मोदींची प्रतिक्रियाNarendra Modi on Delhi Election | आपने मेट्रोचं काम रखडून ठेवलं, नरेंद्र मोदींची केजरीवालांवर टीकाNarendra Modi on Delhi Election| आम्ही दिल्लीत नवीन इतिहास घडवला, नरेंद्र मोदींचे प्रतिपादन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Delhi Election : 'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
Delhi Election Result 2025 : कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
Delhi Assembly Election 2025: दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30 उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
Rohit Pawar on Delhi Election : तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
Embed widget