एक्स्प्लोर
एकदा तरी राज ठाकरेंना आघाडीच्या व्यासपीठावर बोलवून दाखवा : विनोद तावडे
आगामी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. निवडणुकीत भाजपच्या विरोधात प्रचार करणार असल्याचंही पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं.
मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतं हवी असतील, तर एकदा तरी राज ठाकरे यांना आघाडीच्या व्यासपीठावर बोलावून दाखवा, अशी लपून काय मदत घेता, असं आव्हान शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलं आहे. ते मुंबईत बोलत होते.
आगामी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. निवडणुकीत भाजपच्या विरोधात प्रचार करणार असल्याचंही पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. तसंच काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यावरुनच विनोद तावडे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला आव्हान दिलं आहे.
तुम्हाला लाज का वाटत नाही?
"लाज कशी वाटत नाही?, असा प्रचार काँग्रेस महाराष्ट्रात करत आहे. पण आम्ही त्यांना विचारतो तुम्हाला लाज का वाटत नाही? सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा, लोक पाणी मागतात तेव्हा करंगळी दाखवली, त्यावेळी तुम्हाला लाज वाटली नाही का? आम्ही जो विकास केला त्याचा अभिमान वाटला पाहिजे," असं तावडे यावेळी म्हणाले.
कायद्यानुसार सिंचन घोटाळ्याची कारवाई
सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांची केस कोर्टात आहे, त्याचा निकाल कधीही येऊ शकतो, असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्याविषयी विचारलं असता विनोद तावडे म्हणाले की, "सिंचन घोटाळा झाला हे वास्तव आहे. कायद्यानुसार जी कारवाई आहे ती होणारच. मात्र निवडणुकीच्या अनुषंगाने हा मुद्दा पुढे करत नाही."
मोदींना चिंता पवार घराण्याची चिंता
वर्ध्याच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवार कुटुंबावर केलेल्या टीकेला शरद पवारांनी उत्तर दिलं. त्यावर विनोद तावडे म्हणाले की, "शरद पवारांना खरंच वाटत असेल की पवार कुटुंबियांची काळजी कोणी नये, तर पार्थ, रोहित, अजित पवार काय करतात हे पवारांनी पाहावं." "नरेंद्र मोदींना पवार घराण्याची चिंता होती म्हणून ते असं बोललं," असं तावडेंनी सांगितलं.
संबंधित बातम्या
मनसेचं इंजिन यार्डात, लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे पक्षाचे स्पष्टीकरण, पाठिंब्याबाबत गुपित कायम
सिंचन घोटाळा प्रकरणाचा निकाल कधीही येऊ शकतो, चंद्रकांत पाटलाचं दबावतंत्र
मोदींनी पवार कुटुंबाऐवजी शेतकरी, बेरोजगारांची काळजी करावी : अजित पवार
राष्ट्रवादीत गृहयुद्ध, पवारांचे पुतणे पक्षावर ताबा मिळवत आहेत : पंतप्रधान मोदी
अजित पवार उत्तम प्रशासक, मोदींनी पवार कुटुंबाची चिंता करु नये : शरद पवार
03 Apr 2019 08:32 AM
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement