एक्स्प्लोर
Advertisement
Vile Parle Vidhan Sabha: विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात पराग अळवणी की संदीप नाईक, कोण मारणार बाजी?
Vile Parle Vidhan Sabha Constituency Election: यंदाच्या निवडणुकीत विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात कोण विजयी गुलाल उधळवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Vile Parle Vidhan Sabha Constituency Election: विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून पराग अळवणी (भाजप) यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून संदीप नाईक (शिवसेना ठाकरे गट) यांना तिकीट देण्यात आली आहे. पराग अळवणी यांनी 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला होता.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराग अळवणी यांना 84991 मते मिळाली होतीत. तर काँग्रेसचे जयंती सिरोया यांना 26564 मते तर मनसेच्या जुईली शेंडे यांना 18406 मते मिळाली होती. यंदा ठाकरे गटाकडून संदीप नाईक यांना संधी देण्यात आली आहे. तर मनसेकडून जुईली शेंडे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात कोण विजयी गुलाल उधळवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement