(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Assembly Election 2019 | विधानसभा निवडणुकीचा आज निकाल, कशी होणार मतमोजणी?
विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाचे कर्मचारी सज्ज झाले आहेत. मतमोजणी केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान आज पार पडणार आहे. यासाठी एका मतदारसंघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात 14 ते 20 टेबल ठेवण्यात येतात. एका टेबलसाठी एक पर्यवेक्षक आणि दोन सहाय्यक असे तीन मतमोजणी कर्मचारी असतात. मतदार संघातील 5 बूथच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते. हे पाच बूथ चिठ्ठी टाकून निवडले जातात. व्हीव्हीपॅटमधील चिट्ठीतील मते आणि आणि ईव्हीएमवरील मतांची पडताळणी यावेळी केली जाते. पहिल्यांदा इटीपीबी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट) बारकोडद्वारे मोजली जाईल. टपाली मतेही सुरुवातीला मोजली जातील.
सरासरी प्रत्येक टेबलला एक मायक्रो ऑब्झर्वरची (निरीक्षक) नियुक्त करण्यात आलेले आहेत. प्रत्येक टेबलला संगणकीय पद्धतीने आकडेवारी भरण्यासाठी तांत्रिक कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. प्रत्येक टेबलला स्ट्रॉंग रुमपासून ईव्हीएमने ऑन करण्यासाठी एक शिपाई नियुक्त करण्यात आला आहे. स्ट्रॉंग रुम तसेच मतमोजणी केंद्रामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. स्ट्रॉंग रुममधून मतपेट्या बाहेर काढणे मतमोजणी आणि त्यानंतर पेट्या स्ट्रॉंग रुममध्ये जमा करणे या सर्व बाबींचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाईल.
संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक उपस्थित राहतील. फेरी निहाय मतमोजणीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतील. सर्वसामान्यांना मतमोजणीची माहिती मिळावी यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर स्पिकर लावण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्ट्रॉंगरुमला केंद्रीय सशस्त्र पोलीस बल, राज्य राखीव पोलीस बल आणि स्थानिक पोलीस अशी सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या eciresults.nic.in या संकेतस्थळावर मतदारसंघाचे फेरीनिहाय निकाल, संपूर्ण राज्यातील पक्षनिहाय आघाडीवरील उमेदवार, विजयी उमेदवार, पक्षनिहाय मतदानाची टक्केवारी आदी माहितीदेखील उपलब्ध होणार आहे.
VIDEO | महाराष्ट्रात शिवसेना 100 जागांवर जिंकणार, सेनेशिवाय भाजपचं राज्य येणार नाही- संजय राऊत