रश्मी बर्वे विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!
रश्मी बर्वे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे आता त्या विधानसभा निवडणुकीत उडी घेणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभुमीवर नागपूरमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. तिकीट मिळवण्यासाठी येथील नेते पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहेत. मीच कसा सर्वोत्तम आणि सर्वशक्तीमान उमेदवार आहे, असे पटवून देण्याचा प्रयत्न येथे अनेक नेते करत आहेत. तर जागांवर एकाच पक्षात एकापेक्षा अधिक उमेदवा लक्षात आहेत. असे असतानाच काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वे (Rashmi Barve) विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा
या वर्षीच्या लोकसभा निवडणुकी काँग्रेसने रामटेक या मतदारसंघातून रश्मी बर्वे यांना तिकीट दिले होते. मात्र त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र ग्राह्य नधरण्यात आल्याने त्यांना लोकसभेची निवडणूक लढवता आली नाही. निवडणुकीच्या तोंडावर असताना जात प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे रश्मी बर्वे यांनी नागपूर खंडपीठात दाद मागितली होती. त्यावर हायकोर्टाने त्यांना क्लीन चीट देत त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करणे चुकीचे ठरविले होते. पुढे या निर्णयाविरोधात सरकारने सर्वोच्च न्यायालयात अनुमती याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून नागपूर खंडपीठाने निर्णय कायम ठेवला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे रश्मी बर्वे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे त्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. तशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र त्या नेमकं कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार? हे अद्याप स्पष्ट नाहीये.
लोकसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं होतं?
2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने रश्मी बर्वे यांना रामटेक या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यांनी या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. त्यावेळी त्यांनी मोठं शक्तीप्रद र्शन केलं होतं. मात्र अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जात वैधता पडताळणी समितीने बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात केले. परिणामी बर्वे रमटेकची लोकसभा निवडणूक लढवू शकल्या नव्हत्या.
नागपूरमध्ये दोन जागा राखीव
आता मात्र त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूर जिल्ह्यात उमरेड आणि नागपूर उत्तर या दोन जागा अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी आरक्षित आहेत. त्यामुळे त्या विधानसभा निवडणुकीत उडी घेणार का? निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास त्या नेमकं कोणत्या मतदारसंघाची निवड करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलणार? 'या' नावांची जोरदार चर्चा