एक्स्प्लोर

मोठी बातमी! महाविकास आघाडीचं ठरलं? आज संयुक्त पत्रकार परिषद घेणार, जागावाटपाची घोषणा करण्याची शक्यता

विदर्भातील जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये सध्या मतभेद आहेत. त्यामुळे जागावाटपाचा प्रश्न निकाली लागला आहे का? असे विचारले जात आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) घोषणा झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महायुतीतील जगावाटप जवळपास संपलेले आहे. महायुतीच्या (Mahayuti) तिन्ही पक्षांत सर्वच जागांवर तोडगा निघाला आहे. त्यानंतर 20 ऑक्टोबर रोजी भाजपाने आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आता राज्यातील जनतेला अन्य पक्षांच्या उमेदवारांच्या याद्यांचीही प्रतीक्षा आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार आज महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) तिन्ही घटकपक्ष एकत्र येऊन पत्रकार परिषद घेणार आहेत. तशी शक्यता व्यक्त केली जात आहे.  

महाविकास आघाडीत नेमका वाद काय? 

सूत्रांच्या माहितीनुसार महाविकास आघाडीत विदर्भातील काही जागांवरून वाद चालू आहे. या भागात काँग्रेसचे प्राबल्य जास्त आहे. त्यामुळे आम्हीच या भागात जास्त जागा घेणार असा काँग्रेसची भूमिका आहे. या भागात काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 8 जागा देण्यासाठी तयार आहे. तर ठाकरे यांच्या पक्षाने या भागात एकूण 12 जागांवर दावा सांगितला आहे. या 12 जागांवर महाविकास आघाडीच्या घटकपक्षांचा आमदार नाही. त्यामुळे या जागा आम्हाला द्याव्यात, असे ठाकरेंच्या पक्षाचे मत आहे. याच कारणामुळे मविआ सध्या एकमेकांविषयी नाराजीचा सूर आहे.  

20 ऑक्टोबरच्या रात्री नेमकं काय घडलं? 

महाविकास आघाडीतील हाच वाद सध्या संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जागावाटपावर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी मविआत बैठका, भेट यांचे सत्र चालू आहे. 20 ऑक्टोबर रोजी ठाकरे यांच्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये साधारण अडीच तास चर्चा झाली. या सर्व भेटसत्रांनंतर आता महाविकास आघाडीचे नेते एकत्र येऊन पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले जात आहे. 

पत्रकार परिषद कोण घेणार?

सूत्रांच्या माहितीनुसार 21 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी माहिती दिली आहे. आमचे सगळे ठरले आहे. उद्या जागा वाटप जाहीर होणार आहे, असे देसाई यांनी सांगितले. 20 ऑक्टोबर रोजी शरद पवार, जंयत पाटील, संजय राऊत आणि अनिल देसाई यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीनंतर अनिल देसाई वरील माहिती दिली. त्यामुळे पत्रकार परिषद झालीच तर मविआचा जागावाटपाचा फॉर्म्यूला नेमका काय असणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

Eknath Shinde on Shrikant Pangarkar : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीच्या प्रवेशामुळे शिंदे गटावर चारी बाजूंनी टीकेची झोड, आता एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीतच श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी, अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

मुंबईत मविआचा अनपेक्षित डाव? वर्सोवा किंवा गोरेगाव विधानसभा मतदारसंघात हा उमेदवार रिंगणात उतरवणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Marathi Family Beaten : कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला करणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळायला सुरुवात, सीसीटीव्ही बघून प्रत्येकाचा माग काढणार
कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला करणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळायला सुरुवात, सीसीटीव्ही बघून प्रत्येकाचा माग काढणार
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठया घोषणेची शक्यता, अजितदादा फडणवीसांच्या घरी जाणार, खातेवाटप आजच जाहीर होणार?
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठया घोषणेची शक्यता, अजितदादा फडणवीसांच्या घरी जाणार, खातेवाटप आजच जाहीर होणार?
Eknath Shinde On Maharashtra Cabinet: नाराज आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिला सबुरीचा सल्ला; म्हणाले, जसे मला लाडका भाऊ हे मोठे पद...
नाराज आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिला सबुरीचा सल्ला; म्हणाले, जसे मला लाडका भाऊ हे मोठे पद...
Maharashtra Weather Update: मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात थंडीचा कडाका झाला कमी , येत्या 24 तासांत..
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात थंडीचा कडाका झाला कमी , येत्या 24 तासांत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Goan Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 8 AM : 21 Dec 2024 : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 21 December 2024TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 21 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :  7 AM : 21 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Marathi Family Beaten : कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला करणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळायला सुरुवात, सीसीटीव्ही बघून प्रत्येकाचा माग काढणार
कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला करणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळायला सुरुवात, सीसीटीव्ही बघून प्रत्येकाचा माग काढणार
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठया घोषणेची शक्यता, अजितदादा फडणवीसांच्या घरी जाणार, खातेवाटप आजच जाहीर होणार?
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठया घोषणेची शक्यता, अजितदादा फडणवीसांच्या घरी जाणार, खातेवाटप आजच जाहीर होणार?
Eknath Shinde On Maharashtra Cabinet: नाराज आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिला सबुरीचा सल्ला; म्हणाले, जसे मला लाडका भाऊ हे मोठे पद...
नाराज आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिला सबुरीचा सल्ला; म्हणाले, जसे मला लाडका भाऊ हे मोठे पद...
Maharashtra Weather Update: मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात थंडीचा कडाका झाला कमी , येत्या 24 तासांत..
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात थंडीचा कडाका झाला कमी , येत्या 24 तासांत..
Tamhini Ghat Bus Accident : ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Kalyan attack marathi family: कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाचे दिवस फिरले, पोलिसांनी दिव्याचा तोरा उतरवला, आरटीओने दंड ठोठावला
कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाचा तोरा उतरवला, मोठी कारवाई
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार, पालघरमधील धक्कादायक प्रकार
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार
Embed widget