मुंबईत मविआचा अनपेक्षित डाव? वर्सोवा किंवा गोरेगाव विधानसभा मतदारसंघात हा उमेदवार रिंगणात उतरवणार?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. माजी आमदार आणि समाजवादी गणराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कपिल पाटील (Kapil Patil) यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश (joins Congress) केला आहे.
Kapil Patil joins Congress : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी आमदार आणि समाजवादी गणराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कपिल पाटील (Kapil Patil) यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश (joins Congress) केला आहे. दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत कपिल पाटील यांनी प्रवेश केला आहे. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, सुनील केदार, सतेज पाटील उपस्थित होते. दरम्यान, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता कपिल पाटील यांना गोरेगाव विधानसभा मिळण्याची शक्यता आहे.
शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी जनता दलाला रामराम केल्यानंतर आणि समाजवादी गणराज्य पक्ष या नव्या पक्षाची स्थापना केली होती. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी नवीन पक्षाची स्थापना केली होती. मात्र, आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. महाविकास आघाडीमध्ये गोरेगाव किंवा वर्सोवा ही जागा काँग्रेसला सुटणार आहे. त्या जागेवर कपिल पाटील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
काय म्हणाले कपिल पाटील?
आज आम्ही काँग्रेस पक्षात समाजवादी गणराज्य पक्ष विलीन केला असल्याचे कपिल पाटील म्हणाले. आज खर्गेंच्या निवासस्थानी माझ्या गळ्यात शाल घातली आहे. फॅसिझम विरुद्ध लढायचे आहे. फॅसिझम विरोधात राहुल गांधी लढत आहेत. आम्ही बिनशर्त काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. फॅसिझम विरोधात लढायचं हीच अट आहे. देशात संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधींनी प्रदीर्घ लढा दिला असल्याचे कपिल पाटील म्हणाले.
महाविकास आघाडीची उद्या पत्रकार परिषद, जागावाटप जाहीर होणार
महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) गोटातून महत्वाची बातमी समोर आली आहे. उद्या (21 ऑक्टोबर) महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद ( Press conference) होणार आहे. या पत्रकार परिषदेत जागावाटप जाहीर होणार आहे. कोणता पक्ष किती जागांवर लढणार याचा निर्णय उद्याच्या पत्रकार परिषदेत जाहीर केला जाणार आहे. आमचं सगळं ठरलं आहे. त्यामुळं उद्या जागावाटप जाहीर करणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी दिली. गेल्या दोन ते तीन दिवसापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जागावाटपाच्या संदर्भात बैठका सुरु आहेत.
महत्वाच्या बातम्या:
शिक्षक मतदारसंघात जे आम्हाला पाठिंबा देतील, त्यांनाच पाठिंबा देणार; कपिल पाटील यांचा ठाकरे गटाला इशारा