विधानसभा निवडणूक 2019 | वंचितची 22 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
यंदा विधानसभेच्या सर्वच 288 जागा वंचित लढवणार असल्याचं वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
मुंबई: आज मुंबईत झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या पत्रकार परिषदेत विधानसभेसाठीची पहिली यादी पक्षाने जाहीर केली आहे. या यादीमध्ये 22 उमेदवारांचा समावेश आहे. उमेदवार यादीतील नावांपुढे त्यांचा जातींचादेखील उल्लेख करण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीने आज जाहीर केलेल्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर करवीर विधानसभा मतदारसंघासाठी डॉ. आनंद गुरव यांचं नाव आहे. काल 'आप'ची पहिली यादी जाहीर झाली, त्यातही डॉ. आनंद गुरव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एकाच उमेदवाराला दोन पक्षाकडून उमेदवारी जाहीर केल्याने काहीसं हास्यास्पद चित्र आता समोर उभं राहिलं आहे.
गोपीचंद पडळकर हे वंचित सोबत आहेत, जरी त्यांच्याबद्दल महिन्याभरापासून विविध अफवा ऐकतोय पण ते वंचित सोबतच आहेत, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. तर यंदा विधानसभेच्या सर्वच 288 जागा वंचित लढवणार असल्याचंदेखील ते म्हणाले.
तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत एकत्र लढलेले वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम विधानसभेसाठी स्वबळ आजमवणार आहे. एमआयएमनेसुद्धा विधानसभेसाठी 12 उमेदवारांची यादी जाहीर केली. रविवारी पुणे छावणीमधून हिना शफीक मोमीन, सोलापूर मध्य येथून फारूख मकबूल शाब्दी, सोलापूर दक्षिणमधून सुफिया तौफिक शेख व सांगोला (सोलापूर) मतदारसंघातून शंकर भगवान सरगर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
याआधी एमआयएमकडून तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे आतापर्यंत एकूण 12 जागांवरील उमेदवार एमआयएमकडून निश्चित करण्यात आले आहेत.
विधानसभेसाठी वंचितकडून हे 22 उमेदवार लढणार
- सुरेश जाधव, शिराळा मतदारसंघ
- डॉ. आनंद गुरव, करवीर मतदारसंघ
- दिलीप पांडुरंग कावडे, दक्षिण कोल्हापूर मतदारसंघ
- बाळकृष्ण शंकर देसाई, दक्षिण कराड मतदारसंघ
- डॉ. बाळासाहेब चव्हाण, कोरेगाव मतदारसंघ
- दीपक शामदिरे, कोथरूड मतदारसंघ
- अनिल कुऱ्हाडे, शिवाजीनगर मतदारसंघ
- मिलिंद काची, कसबापेठ मतदारसंघ
- शहानवला जब्बारशेख, भोसरी मतदारसंघ
- शाकिर इसालाल तांबोळी, इस्लामपूर मतदारसंघ
- किसन चव्हाण, पाथर्डी शेवगाव मतदारसंघ
- अरुण जाधव, कर्जत जामखेड मतदारसंघ
- सुधीर शंकरराव पोतदार, औसा मतदारसंघ
- चंद्रलाल मेश्राम, ब्रह्मपुरी मतदारसंघ
- अरविंद सांडेकर, चिमूर मतदारसंघ
- माधव कोहळे, राळेगाव मतदारसंघ
- शेख शफी अब्दुल नबी शेख, जळगाव मतदारसंघ
- लालूस नागोटी, अहेरी मतदारसंघ
- मणियार राजासाब, लातूर शहर मतदारसंघ
- नंदकिशोर कुयटे, मोर्शी मतदारसंघ
- अॅड. आमोद बावने, वरोरा मतदारसंघ
- अशोक गायकवाड, कोपरगाव मतदारसंघ