एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

UP Election Result 2022 : कोण होणार यूपीचा नवा कारभारी ? मॅजिक फिगर गाठण्यासाठी दिग्गजांची धडपड

राजकीयदृष्ट्या उत्तर प्रदेशला एक वेगळे महत्त्व आहे. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागा आहे. या सर्व जागांचे निकाल आज स्पष्ट होणार आहे.

UP Election Result 2022 : राजकीयदृष्ट्या सगळ्यात महत्त्वाचे राज्य म्हणून उत्तर प्रदेशकडे बघितले जाते. कारण देशात सगळ्यात जास्त विधानसभेच्या जागा या उत्तर प्रदेशमध्ये आहेत. तसेच लोकसभेच्या देखील सर्वात जास्त जागा यूपीमध्येच आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या उत्तर प्रदेशला एक वेगळे महत्त्व आहे. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागा आहे. या सर्व जागांचे निकाल आज स्पष्ट होणार आहे. यामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, उत्तर प्रदेशचा नवा कारभारी कोण? याचा फैसला अवघ्या काही तासांमध्येच होणार आहे.

यूपीमध्ये विधानसभेच्या 403 जागा आहेत. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 202 जागा जिंकाव्या लागणार आहेत. ज्या पक्षाला 202 जागा मिळवता आल्या तोच पक्ष यूपीचा कारभारी ठरणार आहे. यूपीमध्ये योगी आदित्यनाथ, अखिलेश यादव, चंद्रशेखर आझाद रावण यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. 

यूपीमध्ये या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला? 

योगी आदित्यनाथ(भाजप) - गोरखपूर शहर 
चंद्रशेखर आझाद रावण (भीम आर्मी) - गोरखपूर शहर 
अखिलेश यादव (सपा)- करहल 
एस.पी. बघेल (भाजप)- करहल 
केशव प्रसाद मौर्य (भाजप- सिराथू 
डॉ. पल्लवी पटेल (सपा)-सिराथू 
शिवपाल यादव (सपा)- जसवंतनगर 
आझम खान (सपा)- रामपूर 
ओमप्रकाश राजभर (सपा+) - जहुराबाद 
कृष्णा पटेल (सपा+)- प्रतापगड 
स्वामी प्रसाद मौर्य (सपा)- फाझिलनगर 
दारा सिंह चौहान (सपा)- घोसी 
पंखुडी पाठक (काँग्रेस)- नोएडा 
राजेश्वर सिंह (भाजप)- सरोजिनीनगर 
आदिती सिंह (भाजप)- रायबरेली 

उत्तर प्रदेशमध्ये गाजलेले मुद्दे

राम मंदिर निर्माण
शेतकरी आंदोलन
हाथरस बलात्कार प्रकरण
लखीमपूर हिंसाचार
गंगा किनाऱ्यावरचे मृतदेह
एक्झिट पोल काय सांगतोय? 

दरम्यान, निवडणुका जाहीर झाल्यानंतर यूपीमध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या होत्या. अनेकांनी भाजपला रामराम करत समाजवादी पार्टीचा रस्ता झरला होता. विद्यमान योगी मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांनी देखील समाजवादी पार्टीत प्रवेश केला होता. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपला फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे. 
मात्र, एक्झीट पोलनुसार उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपच बाजी मारणार असल्याचं स्पष्ट होत आहे. समाजवादीच्या अखिलेश यादव यांनी मोदी-योगींना जबरदस्त टक्कर दिली असली तरी भाजप आपली सत्ता कायम राखणार असल्याचं या पोलमधून स्पष्ट झालं आहे. एक्झिट पोलनुसार भाजप 228 ते 244 तर समाजवादी पक्ष 132 ते 148 जागा जिंकण्याची शक्यता आहे.

2017 ची स्थिती 
उत्तर प्रदेशमध्ये 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 317 जागा, समाजवादी पक्षाला 47 जागा, बसपाला 19 जागा तर काँग्रेसला केवळ सात जागा मिळाल्या होत्या. 2017 मध्ये भाजपने मोठ्या फरकारने इतर पक्षांचा पराभव केला होता. मागील निवडणुकांच्या तुलनेत यंदा भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगरZero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget