UP Election 2022 : यूपीमध्ये सहाव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, दिग्गजांच्या जाहीर सभा
यूपीमध्ये 3 मार्चला सहाव्या टप्प्यातील 57 जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी होणाऱ्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत.
UP Election 2022 : उत्तर प्रदेशमध्ये पाच टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. 3 मार्चला सहाव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया होणार आहे. या सहाव्या टप्प्यात विधानसभेच्या 57 जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी होणाऱ्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या तोफा धडाडणार आहेत. हे दोघेही आज विविध ठिकाणी प्रचार सभा घेणार आहेत.
या सहाव्या टप्प्यात यूपीतील 10 जिल्ह्यात मतदान होणार आहे. यामध्ये आंबेडकर नगर, बलरामपूर, सिद्धार्थनगर, बस्ती, संत कबीर नगर, महाराजगंज, गोरखपूर, कुशीनगर, देवरिया आणि बलिया या जिल्ह्यातील 57 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. या टप्प्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भवितव्यही मतपेटीत बंद होणार आहे. योगी आदित्यनाथ हे गोरखपूरच्या सदर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आज 7 जाहीर सभा
सकाळी 10.15 - पिपराइच विधानसभा, गोरखपूर
सकाळी 11.05 - पणियारा विधानसभा, महाराजगंज
दुपारी 12 - कपिलवस्तु विधानसभा, सिद्धार्थनगर
दुपारी 1.10 - तुळशीपूर, गेंसडी विधानसभा, बलरामपूर
दुपारी 2 - बलरामपूर व उत्रौला विधानसभेसाठी
दुपारी 3.10 - डुमरियागंज विधानसभा, सिद्धार्थनगर
दुपारी 4.15 - सहजवा विधानसभा, गोरखपूर
तर दुसरीकडे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव हे बलिया आणि गोरखपूरच्या दौऱ्यावर असमार आहेत. त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या देखील आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत आज त्या विविध ठिकाणी प्रचारसभा करणार आहेत. तसेच केंद्रीय संरक्षमंत्री हेदेखील आज यूपीच्या दौऱ्यावर आहेत. ते विविध ठिकाणी प्रचार सभा घेणार आहत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हेदेखील आज यूपीमध्ये विविध ठिकाणी प्रचार सभा घेणार आहेत.
यूपीमध्ये सहाव्या टप्प्यात 10 जिल्ह्यांतील 57 जागांसाठी मतदान होत आहे. यासाठी एकूण 676 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गेल्या वेळी म्हणजे 2017 मध्ये, या 57 जागांपैकी 46 जागा भाजपने जिंकल्या होत्या. या टप्प्यात एकूण 2 कोटी 14 लाख 62 हजार 816 मतदार आहेत. यामध्ये 1 कोटी 14 लाख 63 हजार 113 पुरुष, तर 99 लाख 98 हजार 383 महिला आणि 1 हजार 320 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या: