Uddhav Thackeray : पूर्वी भाव गद्दारांना होता, होय मी रस्त्यानेच आलो, कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का? राणेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा कडक 'प्रहार'!
Uddhav Thackeray : आपलं कोकण म्हणजे आयुष्य आहे. त्या गुंडांच्या हातात देऊ नका ते वकवक करत आहेत अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राणे कुटुंबावर प्रहार केला.
Uddhav Thackeray : धारावी अदानीच्या घशात घालण्यात आली, तसेच दीपक केसरकर कोकण त्या लोकांच्या घशात घालतील त्यांना गाडलं पाहिजे, अशा शब्दात शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सावंतवाडीमध्ये बोलताना घणाघाती प्रहार केला. ठाकरे यांची कोकणमध्ये सभा होत असल्याने उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष होते. सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर यांच्या विरोधात ठाकरे गटाचे राजन तेली उमेदवार आहेत. ठाकरे यांनी केसरकर आणि राणे कुटुंबाचा चांगलाच समाचार घेतला.
कोकण गुंडांच्या हातात देऊ नका
ठाकरे म्हणाले की रोज मी महाराष्ट्रभर फिरत आहे. आज तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. गेल्यावेळी काही गडबड झाली समजले नाही, संभ्रम निर्माण करण्यात आला, इथल्या कुठल्यातरी मैदानात टेबल टाकण्यात आली होती. मात्र, ती टेबल एका दिवसासाठी होती. मात्र, तुम्ही तुमचा आयुष्य त्यांच्या हातात दिलं असल्याचे ते म्हणाले. आपलं कोकण म्हणजे आयुष्य आहे. त्या गुंडांच्या हातात देऊ नका ते वकवक करत आहेत अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राणे कुटुंबावर प्रहार केला.
कोकण दरोडेखोराच्या हातात द्यायचं का?
रत्नागिरी व सिंधुदुर्ग लोकसभेला नको त्या माणसाला निवडून दिलं, अशा शब्दात ठाकरे यांनी नारायण राणे यांना टोला लगावला. कोकण दरोडेखोराच्या हातात द्यायचं का? अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली. वैभव नाईक यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी मी धावून आलो होतो अशी आठवण त्यांनी करून दिली. आजपर्यंत भाव गद्दारांना होता. मात्र, लोकसभेत पडल्यानंतर यांना शेतकरी, लाडकी बहीण आठवल्याची टीका त्यांनी केली. ठाकरे यांनी होय मी रस्त्याने आलो आहे म्हणत राणेंना टोला लगावला.
केसरकर पडल्यानंतर महाराजांचा चांगला पुतळा होईल
ते पुढे म्हणाले की दीपक केसरकर तर खाली मुंडी आणि पातळधुंडी आहे. 2014 मध्ये चांगला माणूस म्हणून आव आणला होता. मनी नाही भाव देवा मला पाव अशी केसरकरांची स्थिती असल्याचा हल्लाबोल सुद्धा ठाकरे यांनी केला. मोदी स्वतः या ठिकाणी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी आले मात्र ते ढोंगी असल्याची टीका त्यांनी केली. दाढीवाला मिंधे म्हणतो पुतळा वाऱ्याने कोसळला, केसरकर पुतळा कोसळला चांगलं झालं म्हणतो, मात्र केसरकर पडल्यानंतर महाराजांचा चांगला पुतळा होईल असा टोला सुद्धा त्यांनी लगावला. ठाकरे यांनी सत्ता येताच चांगलं हॉस्पिटल उभारणार असल्याची ग्वाही दिली.
ते म्हणाले की, दीपक केसरकर अदानीसाठी जागा शोधत होते, कोकण आदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली. माझं सरकार आलं तर अदानीकडून जमिनी घेणार आणि गिरणी कामगारांना देणार असल्याचे ते म्हणाले. शेतकरी महाराष्ट्रामध्ये त्रस्त आहेत मी त्यांना कर्जमुक्त केलं. सरकार आले की पुन्हा एकदा कर्जमुक्त करणार असल्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या