एक्स्प्लोर
शरद पवारांना लाज, लज्जा शरम काहीच राहिली नाही, उद्धव ठाकरेंची टीका
ठाकरे म्हणाले की, शिवसेना भाजपचं नातं खट्टंमीठं होतं, त्यामुळे मध्ये थोडं काम कमी झालं असेल पण आता युती झाली आहे त्यामुळं तुम्हाला सगळं गोड मिळेल, असं ते म्हणाले.
बुलडाणा : शरद पवारांना लाज, लज्जा शरम काहीच राहिली नाही अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. तर राहुल गांधींना 'बाळा राहुल हे हिंदुस्तान आहे, इथे नामर्दाला जागा नाही' असं म्हणत देशद्रोहाला जवळ करणाऱ्यांना तुम्ही निवडून देणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला. खामगावमध्ये बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते.
यावेळी ठाकरे म्हणाले की, काश्मीरमध्ये 370 आम्ही काढणार नाही असं म्हणत आहेत. या देशातून देशद्रोहचा कलम काढून टाका असं काही लोकांचं म्हणणं आहे. शरद पवारांना काही लाज, लज्जा शरम राहिलीच नाही, त्यामुळं मी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतदारांना विचारतोय तुम्हाला हे चालेल का, असं ठाकरे यावेळी म्हणाले.
राहुल गांधींवर टीका करताना ते म्हणाले की, उद्या दाऊद कॉंग्रेसमध्ये आला तर त्याला काँग्रेसवाले दाऊदजी म्हणतील. 'बाळा राहुल हे हिंदुस्तान आहे, इथे नामर्दांना जागा नाही, शब्दात त्यांनी टीका केली.
ठाकरे म्हणाले की, शिवसेना भाजपचं नातं खट्टंमीठं होतं, त्यामुळे मधे थोडं काम कमी झालं असेल, पण आता युती झाली आहे, त्यामुळं तुम्हाला सगळं गोड मिळेल, असं ते म्हणाले.
मोदींनी 2 वेळा सर्जिकल स्ट्राईक केला. सर्जिकल स्ट्राईकवर संशय घेतले जात आहेत. त्यावर राजकारण करू नका, शौर्याचे पुरावे मागू नका, असे ते म्हणाले. शरद पवार साहेब तुम्हीच म्हणाले होते की माझ्या सल्ल्याने सर्जिकल स्ट्राईक झाला, मग तो झाला की नाही झाला याचं उत्तर द्या, असेही ते म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement