एक्स्प्लोर
आम्ही कुणावर अन्याय होऊ दिला नाही आणि यापुढेही होऊ देणार नाही : उदयनराजे भोसले
आम्ही कुणावर अन्याय होऊ दिला नाही आणि यापुढेही होऊ देणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी यांनी केलं.

सातारा : मला कॉलेज जीवनापासून रामराजे निंबाळकर यांचा पाठिंबा आहे. या पाठिंब्यामुळेच आम्ही कुणावर अन्याय होऊ दिला नाही आणि यापुढेही होऊ देणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी यांनी केलं. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारानिमित्त सातारा जिल्ह्यातील कराड येथे महाआघाडीची पहिली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे सभापती रामराजेंचा नाईक निंबाळकर, स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे, यांच्यासह इतर घटक पक्षातील नेते उपस्थित आहेत. यावेळी बोलताना उदयनराजेंनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 2014 च्या निवडणुकीत मोदींनी जे आश्वासनं दिले होते त्या आश्वासनाला देशाची जनता बळी पडली. तळागाळातील लोकांना काळात घालण्याचं काम यांनी केलं. भाजपाला मतदान करुन जनतेला काहीच मिळालं नाही, असं उदयनराजे म्हणाले. मोदी सरकारने मेक इन इंडिया या योजनेची घोषणा केली. मात्र ही मेक इन इंडिया नाही तर ब्रेक इन इंडिया योजना आहे, असा घणाघात उदयनराजे यांनी केला. आज शेतकऱ्यांची अवस्था फार वाईट झाली आहे. जर देशातील शेतकऱ्यांची अवस्था बदलायची असेल तर सत्तेत बदल करा, असं देखील उदयनराजे यांनी उपस्थितांना आवाहन केलं. VIDEO | एक बार अगर मैने कमिटमेंट कर दी तो मैं अपनी आप की भी नही सुनता : उदयनराजे भोसले | कराड | एबीपी माझा मला इथे बसलेल्या सर्व मान्यवरांची साथ लाभली आहे. मात्र सर्वात जास्त मला रामराजे निंबाळकर यांचा पाठिंबा होता. त्यांनी मला कॉलेज जीवनापासून पाठिंबा राहिला आहे आणि याचे साक्षिदार सत्यजित पाटणकर आहेत. आम्ही तेंव्हापासून कोणावर अन्याय होऊ दिला नाही आणि यापुढेही होऊ देणार नाही, असं देखील उदयनराजे म्हणाले. महाआघाडीने कराडमधून तर महायुतीने कोल्हापूरमधून प्रचाराचा नारळ फोडला. महायुतीच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांची उदयनराजे विरुद्ध साताऱ्यातून उमेदवारी जाहीर केला. आता नरेंद्र पाटील आणि उदयनराजे यांच्यात टक्कर पाहायला मिळणार आहे. UNCUT | महाआघाडीची प्रचार सभा, खासदार उदयनराजे भोसले यांचं भाषण | कराड | एबीपी माझा
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
धाराशिव
राजकारण




















