एक्स्प्लोर
तुमसर-मोहाडी मतदारसंघ : बालेकिल्ला भाजपचा पण शोध सक्षम उमेदवाराचा
तुमसर विधानसभा मतदारसंघ हा भंडारा जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदारसंघ. भाजपच्या मधुकर कुकडेंनी तब्बल तीनवेळा या मतदारसंघातून आमदारकी जिंकली मात्र एकदा पराभूत झाल्यावर त्यांनी पक्ष सोडला आणि राष्ट्रवादीकडून थेट खासदार झाले. सध्या इथे भाजपचेच आमदार असले तरी मतदारांच्या मनात काय आहे त्याचा ठावठिकाणा लागत नाही
![तुमसर-मोहाडी मतदारसंघ : बालेकिल्ला भाजपचा पण शोध सक्षम उमेदवाराचा Tumsar Mohadi Bhandara Profile Maharashtra Election News Constituency wise तुमसर-मोहाडी मतदारसंघ : बालेकिल्ला भाजपचा पण शोध सक्षम उमेदवाराचा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/20171526/Tumsar-Vidhansabha-new.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
तुमसर हा भंडारा जिल्ह्यातील मतदारसंघ. लोकसभेसाठी भंडारा-गोंदिया असा दोन जिल्ह्याचा मिळून एक मतदारसंघ बनतो. गोंदिया हा राज्याच्या अतिपूर्वेकडील एक जिल्हा. भंडारा-गोंदिया हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल पटेल यांचा गड. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते मोदी लाटेत पराभूत झाले. मात्र नाना पटोलेंनी भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने गोंदिया-भंडाऱ्याची जागा पुन्हा खेचून घेतली.
२०१४ च्या विधानसभा राज्यात सर्वच मोठ्या पक्षांनी स्वतंत्रपणे लढल्या. तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघात भाजपचे चरण वाघमारे हे तब्बल २८ हजार मतांनी निवडून आले. तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघ पुन्हा काबीज करण्यात आमदार चरण वाघमारे यांना यश आलं. गेल्या पाच वर्षात आमदार चरण वाघमारे यांनी आपल्या मोठ्या प्रमाणात विकासकामे केल्याचा दावा त्यांचे कार्यकर्ते करतात.
तुमसर विधानसभा मतदारसंघात धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. धानाला बोनस, शेतकरी कर्जमाफी, मतदारसंघातली विकास कामे चरण वाघमारे यांच्यासाठी जमेची बाजू ठरतील असं त्यांच्या समर्थकांना वाटतं. या विधानसभा क्षेत्रात सिंचन हा महत्वाचा भाग असल्यामुळे गेल्या पाच वर्षात तीन हजार हेकटर जमिनीवर सिंचन वाढलं आहे. याचा फायदा येथील शेतकऱ्यांना झालेला आहे.
यामध्ये आंतरराज्यीय बावनथडी धरणालगत असलेल्या शेतकऱ्यांचा सिंचन आणि पाण्याचा प्रश्न मोठा आहे. गेल्या २३ वर्षांपासून १५ पेक्षा गावांचा पाणी प्रश्न प्रलंबित आहे. विरोधक या प्रश्नावरून नेहमीच आक्रमक दिसतात. तर ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात असला तरी या भागात गेल्या पाच वर्षात पुरेशा रोजगाराच्या संधी निर्माण झालेल्या नाहीत. त्यामुळे सीमावर्ती भागातील बेरोजगार तरुण दरवर्षी मोठ्या शहराकडे पलायन करत असल्याचं दिसतं. त्यामुळे आज या विधानसभा क्षेत्रात विविध योजना राबविल्या गेल्या असल्या तरी अजूनही अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.
भारतीय जनता पक्षाचा गड समजल्या जाणाऱ्या तुमसर - मोहाडी विधानसभा मतदारसंघाचं १९९५ ते २००९ पर्यंत भाजप आमदार म्हणून मधुकर कुकडे यांनी सलग १५ वर्षे नेतृत्व केलं. मात्र २००९ मध्ये मधुकर कुकडे यांना काँग्रेसच्या अनिल बावनकर यांनी पराभूत केलं. मात्र २०१४ साली पुन्हा तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघ भाजपच्या चरण वाघमारेंनी जिंकला.
भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचा विचार केला असता. भंडारा जिल्ह्यात भंडारा, तुमसर, साकोली हे तीन विधानभा मतदारसंघ आहेत. या तिनही ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत देखील देशात मोदी लाट असल्याने ती तिन्ही विधानसभा क्षेत्रासह लोकसभा मतदारसंघही भाजपने जिंकला होता. मात्र भाजप खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद मोदी शेतकऱ्याचे प्रश्न ऐकून घेत नसल्याचा आरोप करीत भाजप खासदारकीचा २०१७ मध्ये राजीनामा दिला. नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध राष्टवादीच्या लढतीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे निवडून आले. तुमसरमधून भाजपच्या तिकीटावर तब्बल तीनवेळा निवडून आलेले मधुकर कुकडे राष्ट्रवादीच्या तिकिटावर दिल्लीला पोहोचले. मात्र २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुनील मेंढे हे तब्ब्ल दोन लाख मतांनी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात निवडून आले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)