Tuljapur VidhanSabha Election : राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
Tuljapur VidhanSabha Election : तुळजापूर विधानसभ मतदारसंघात भाजपचे राणा पाटील आणि काँग्रेसकडून धीरज पाटील आमने-सामने असणार आहेत.
Tuljapur VidhanSabha Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी आपली उमेदवार यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. महायुतीमध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आला आहे. तर महाविकास आघाडीमधून तुळजापूरची जागा काँग्रेस पक्ष लढवणार आहे. त्यामुळे तुळजापुरात काँग्रेस आणि भाजप आमने-सामने असणार आहे.
सध्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे राणाजगजितसिंह पाटील हे विद्यमान आमदार आहेत. राणा पाटील यापूर्वी कळंब धाराशिव विधासभेचे आमदार होते. 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तुळजापूर विधानसभा लढवत ते आमदार झाले होते. आता भाजपने पुन्हा एकदा त्यांना तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरवलं आहे. तर काँग्रेसकडून त्यांच्याविरोधात धीरज पाटील हे उमेदवार असणार आहेत. काँग्रेसने ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांना थांबवत धीरज पाटील यांना राणाजगजितसिंह पाटील यांना मैदानात उतरवलं आहे.
2019 मध्ये भाजपच्या राणा पाटलांना मारली बाजी
ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राणा पाटील यांनी भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना तुळजापूर विधानसभेतून उमेदवारी देण्यात आली होती. राणा पाटलांनी या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांचा पराभव केला होता. त्यानंतर राणा पाटील गेल्या पाच वर्षांपासून तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सक्रिय आहेत. त्यांनी विकास कामांच्या माध्यमातून जनमत वळवण्याचा प्रयत्न केला आहे.
धीरज पाटील यांना राणा पाटलांविरोधात उमेदवारी
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण लढण्यास इच्छुक होते. मात्र, पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारत धीरज पाटील यांना संधी दिली आहे. धीरज पाटील हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांना संधी देण्यात आली आहे. धीरज पाटील निवडणूक लढणार असले तरी मधुकरराव चव्हाण यांची देखील निवडणुकीत महत्त्वाची भूमिका असणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अशोक जगदाळे यांनी मतं घेतली होती. त्यामुळे मतविभाजन टाळण्याचं आव्हानही धीरज पाटील यांच्यासमोर असणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या