एक्स्प्लोर
Advertisement
तोंडी परीक्षा : पर्रिकरांकडून मोदींना ब्लॅकमेल, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप
मी मुख्यमंत्री असताना प्रकाश आंबेडकरांना अकोल्याची जागा दिली होती, आघाडीत येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्या ठिकाणी सोयीचा उमेदवार द्यावा अशी त्यांची मागणी होती. ते ओव्हर कॉन्फिडंट होती. त्यामुळे अकोल्यात काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला आम्ही तिकीट दिलं, पण त्यावेळी आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर आले, असा किस्सा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितला.
मुंबई : स्वतःची स्वच्छ प्रतिमा जपत पक्षावर लागलेले कलंक पुसण्याचे प्रयत्न करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 'एबीपी माझा'च्या शाळेत आले होते. 'तोंडी परीक्षा' देताना परीक्षार्थीच्या भूमिकेत असणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांनी राफेलप्रकरणी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला.
भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत समाविष्ट करण्याबाबत चर्चा सुरु आहे. आपण जागांचा प्रस्ताव दिला आहे. मात्र रा. स्व. संघाशी तडजोड करणार नाही, अशा पत्रावर सही करुन देण्याची आश्चर्यकारक मागणी आंबेडकरांनी केली आहे, असं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं.
वाटाघाटी फक्त आंबेडकरांशी सुरु आहेत, वंचित आघाडीशी नाही. काही जागा काँग्रेसच्या कोट्यातून दिल्या जाणार आहेत, तर काही राष्ट्रवादीच्या. सुरुवातीला फुगवून आकडा मागितला जातो, मात्र खरंच तितके उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे का, हे तपासून पाहिलं जात असल्याचंही पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं.
मी मुख्यमंत्री असताना प्रकाश आंबेडकरांना अकोल्याची जागा दिली होती, आघाडीत येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्या ठिकाणी सोयीचा उमेदवार द्यावा अशी त्यांची मागणी होती. ते ओव्हर कॉन्फिडंट होती. त्यामुळे अकोल्यात काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला आम्ही तिकीट दिलं, पण त्यावेळी आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर आले, असंही चव्हाणांनी सांगितलं.
तोंडी परीक्षा : शिवसेनेच्या यूटर्नबाबत अनिल परब काय म्हणतात?
एमआयएमला आम्ही जातीयवादी पक्ष मानतो. आम्हाला धर्मनिरपेक्ष पक्ष हवा आहे. मनसेची राजकीय भूमिका अडचणीची आहे. उत्तर भारतीयांना काम करु न देणं, त्यांच्यावर हल्ला करणं, कायदा हातात घेऊन तोडफोड करणं, दहशत पसरवणं, ही मनसेची भूमिका काँग्रेसशी मिळतीजुळती नसल्याचं पृथ्वीराज चव्हाणांचं म्हणणं आहे. राज ठाकरे ज्याप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत आहेत, त्यानुसार त्यांची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. आमचे मित्रपक्ष राष्ट्रवादीशी त्यांची बोलणी सुरु आहेत, अशी माहिती चव्हाणांनी दिली. 2014 मध्ये भाजपला 31 टक्के मतं मिळाली होती. त्यांच्या मित्रपक्षांना जवळपास 5 टक्के मतं होती. याचा अर्थ साधारण 62 टक्के जनतेला मोदी नको होते. आमची मतं विभागली गेली, यावेळी ते होऊ नये, यासाठी महागठबंधन करत आहोत. मात्र राज्याराज्यात वेगवेगळ्या पातळ्यांवर या आघाडी असतील. प्रत्येक वेळी ही आघाडी काँग्रेसच्या नेतृत्वात असेल, अशातला भाग नाही. आम्हाला लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष पक्ष हवे आहेत. 15 लाख खात्यात जमा होण्याच्या आश्वासनामुळे नव्हे, तर भ्रष्टाचारमुक्तीचं आश्वासन दिल्यामुळे भाजप सत्तेत आला, असा दावाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. संदर्भासहित स्पष्टीकरण 1. हाताला लकवा भरणे - मित्रपक्षांसोबत काही बाबतीत अडचणी होत्या. देशाच्या हितासाठी काही निर्णय घेतले नाहीत. मात्र त्यामुळे गैरसमज पसरले. परंतु मुद्दाम कोणाला त्रास देण्यासाठी तसं केलं नव्हतं. 2. चौकीदार चोर है - राफेल विमान प्रकरणी राहुल गांधी यांनी ही घोषणा दिली. मोदी सरकारने किमान 30-35 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. प्रत्येक विमानामागे एक हजार कोटी जास्त दिले, याचा अर्थ 36 हजार कोटी रुपये भाजपने खिशात घातले. आता कोण-कसे हे पैसे वाटून घेणार, ते माहित नाही. पृथ्वीराज चव्हाण यांना मिळालेले गुण : 10 पैकी 8 एका वाक्यात उत्तरे द्या 1. पुन्हा मुख्यमंत्री व्हायला आवडेल? - आवडेल, पण तसा आग्रह नाही. सध्याचं भाजप सरकार घालवायचं आहे. 2. दुसरे नारायण मूर्ती होण्याची संधी दवडल्याचा खेद वाटतो का? - नाही 3. सिंचन घोटाळा कोणामुळे - हा भ्रष्टाचार नाही, मात्र धोरणात्मक चुका झाल्या पृथ्वीराज चव्हाण यांना मिळालेले गुण : 10 पैकी 7 कोण कोणास म्हणाले? 1. पहले मंदिर फिर सरकार - शिवसेनेचा पेटंट डायलॉग. बेरोजगारी, शेतकरी, व्यापारी, रोजगार असे अनेक प्रश्न आहेत. 2. राफेलच्या फाईली माझ्या बेडरुममध्ये आहेत - मनोहर पर्रिकर कॅबिनेट सहकाऱ्यांना म्हणाले. मात्र ही पंतप्रधानांना दिलेली धमकी होती. की मला पदावरुन हटवलंत, तर मी घोटाळे बाहेर काढेन, अशा शब्दात त्यांनी ब्लॅकमेल केलं होतं. 3. खून बहा तो पानी रोक देंगे - सिंधू नदीचं पाणी रोखल्यास पाकिस्तानातील शेती नापीक होईल. हा आर्थिक युद्धाचा भाग आहे. मात्र तसं झाल्यास चीनही ब्रह्मपुत्रेचं पाणी रोखेल. पंतप्रधान मूहतोड जवाब देंगे म्हणत आहेत, आम्ही वाट पाहतोय. काँग्रेस पाठिशी असल्याची घोषणा राहुल गांधींनी केली आहे. मात्र भारताने कोणताही आंतरराष्ट्रीय कायदा मोडू नये, असं वाटतं. पाकशी क्रिकेट खेळण्याबाबत सचिन तेंडुलकर- सुनिल गावसकरांच्या मतांशी सहमत आहे पृथ्वीराज चव्हाण यांना मिळालेले गुण : 10 पैकी 8 कल्पनाविस्तार मित्रपक्षाने छाताडावर पाय ठेवला... - उद्या काय होईल माहित नाही, त्यामुळे मित्रपक्षांशी सन्मानाने वागायला हवं. काँग्रेसची संस्कृती टिकवायला हवी. प्रामाणिक भावनेने एकत्र यायला हवं. पृथ्वीराज चव्हाण यांना मिळालेले गुण : 10 पैकी 6 सविस्तर उत्तर द्या आघाडीचा मुख्यमंत्री या नात्याने फडणवीसांच्या पाच वर्षांतील कामगिरीचं मूल्यमापन - भाजप सरकारला बऱ्याच वर्षांनंतर बहुमत मिळालं. पृथ्वीराज चव्हाण यांना मिळालेले गुण : 10 पैकी 7 योग्य पर्याय निवडा 1. महाराष्ट्रात परत येताना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी ब्रीफ काय दिलं? अ. सेना-भाजपला रोखा ब. काँग्रेसच्या बेबंद नेत्यांना आवरा क. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नियंत्रण मिळवा - वातावरण सुधारा 2. शरद पवार म्हणजे- अ. मित्रपक्षाचे ज्येष्ठ नेते, ब. मोदींचे गुरु, क. ज्येष्ठ नेते पण बेभरवशाचे - मित्रपक्षाचे ज्येष्ठ नेते 3. सध्याचे आवडते गांधी कोण? अ. सोनिया गांधी ब. राहुल गांधी क. प्रियांका गांधी - सोनिया गांधी पृथ्वीराज चव्हाण यांना मिळालेले गुण : 10 पैकी 7 पृथ्वीराज चव्हाण यांना मिळालेले एकूण गुण : 60 पैकी 43 पाहा संपूर्ण भाग :अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement