एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजप नेते बाबुल सुप्रियोंना तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मतदान करण्यापासून रोखले
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि गायक बाबुल सुप्रियो यांच्यात आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला आहे. मतदान करण्यासाठी गेलेल्या बाबुल सुप्रियो यांना तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी रोखल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.
कोलकाता : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि गायक बाबुल सुप्रियो यांच्यात आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला आहे. मतदान करण्यासाठी गेलेल्या बाबुल सुप्रियो यांना तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी रोखल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. या प्रकरणामुळे भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आहे. याआधी काही दिवसांपूर्वी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी बाबुल सुप्रियो यांच्या वाहनाची तोडफोड केली होती.
मतदान करण्यासाठी आलेल्या बाबुल सुप्रियो यांना धक्काबुक्कीदेखील करण्यात आली आहे. सुप्रियो आज मतदान करण्यासाठी उत्तर कोलकाता लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर पोहोचले, तेव्हा मतदान केंद्राबाहेर उपस्थित असलेल्या लोकांनी 'वापस जाओ' (परत जा) असा नारा लगावला. मतदान करुन आल्यानंतर सुप्रियो जेव्हा माध्यमांशी बातचित करत होते, तेव्हा तिथेदेखील लोकांनी गोंधळ घातला, परिणामी सुप्रियो यांना माध्यमांशी न बोलताच माघारी फिरावे लागले.
VIDEO | भाजपचे उमेदवार बाबूल सुप्रियोंना धक्काबुक्की | कोलकाता
29 एप्रिल रोजी प्रचारासाठी बाबुल सुप्रियो पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे गेले होते. यावेळी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी सुप्रियो यांच्या गाड्यांची तोडफोड केली होती.
वाचा : मनसे गुंडांचा पक्ष, केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियोंचा हल्लाबोल
VIDEO | तृणमूल कार्यकर्त्यांची गुंडगिरी, भाजप नेते बाबुल सुप्रियो यांच्या गाडीची तोडफोड | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement