भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळेंना तिसऱ्यांदा संधी; अमोल मिटकरी यांचे अकोटमधून विधानसभा लढण्याचा स्वप्नं भंगलं?
Akot : अकोट मतदारसंघातून भाजपने तिसऱ्यांदा विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांना दिली संधी आहे. त्यामुळे आमदार अमोल मिटकरी यांचे विधानसभा लढण्याचा स्वप्नं भंगलं असल्याचे बोलले जात आहे.
Akot Assembly Constituency 2024: अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघातून भाजपने तिसऱ्यांदा विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे (Prakash Bharasakle) यांना दिली संधी आहे. प्रकाश भारसाकळे यांचे नाव जाहीर झाल्यामुळे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांचा अकोटवरील दावा संपुष्टात आला आहे. महायुतीमध्ये आमदार अमोल मिटकरी यांनी पक्षाकडे अकोट मधून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ सोडण्यास भाजपने नकार दिलाय. त्यामुळे आमदार अमोल मिटकरी यांचे विधानसभा लढण्याचा स्वप्नं भंगलं असल्याचे बोलले जात आहे.
अकोटमध्ये तिसर्यांदा उमेदवारी मिळालेल्या प्रकाश भारसाकळेंचे आमदार अमोल मिटकरी यांनी अभिनंदन केलंय. दरम्यान, अजितदादा आणि पक्षासाठी अकोटवरचा दावा सोडला असल्याचेही ते म्हणाले. शेवटी महायुती विजयी होणं हेच लक्ष्य असल्याची प्रतिक्रिया आमदार मिटकरींनी 'एबीपी माझा'ला दिली. महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करू, असेही आमदार मिटकरी म्हणाले.
कोण आहेत प्रकाश भारसाकळे?
अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघात गेल्या दोन टर्मपासून भाजपचे प्रकाश भारसाकळे विजयी झालेत. प्रकाश भारसाकळे हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे आहेत. त्यांनी याआधी दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे पाचवेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. 2009 मध्ये आपला मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर त्यांनी अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघाकडे आपला मोर्चा वळवला. 2009 च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून 35000 मतं प्रकाश भारसाकळे यांनी घेतली होती. 2014 च्या निवडणुकीआधी त्यांनी भाजपात प्रवेश घेत 2014 आणि 2019 च्या दोन्ही निवडणुकीत पक्षाकडून विधानसभेत विजयश्री खेचून आणली. मात्र या निवडणुकीत स्थानिक उमेदवारी या मुद्द्यावर मतदारसंघात भारसाकळे यांच्या विरोधात वातावरण होते. हे दाखविण्याचा प्रयत्नही इतर राजकीय पक्षांकडून होत होता. यासोबतच वाढलेलं वय आणि भारसाकळे यांच्या प्रकृतीच्या कुरबुरी या मुद्द्यावरूनही त्यांना उमेदवारी देऊ नये, असा आग्रह त्यांच्याच पक्षातील इतर इच्छुक करताना दिसून आले. मात्र आज अकोट मतदारसंघातून भाजपने तिसऱ्यांदा विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांना दिली संधी आहे
काँग्रेसच्या महेश गणगणे विरुद्ध प्रकाश भारसाकळे सामना
काँग्रेसने नुकतीच जाहीर केलेल्या यादीत अकोट मधून महेश गणगणे यांना उमेदवारी देण्यात आलीये. महेश गणगणे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री सुधाकरराव गणगणे या यांचे सुपुत्र आहेय. महेश गणगणे यांचे वडील सुधाकरराव गणगणे यांनीसुद्धा अकोटचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलंये. महेश गणगणेंना तिकीट जाहीर झाल्यानंतर अकोटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केलाय. घरी त्यांच्या आईने त्यांचं औक्षण करीत त्यांना शुभेच्छा दिल्यात. या आधी 2014 मध्येही महेश गणगणे यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली होतीय मात्र, त्या निवडणुकीत भाजपाचे प्रकाश भारसाकळे यांनी त्यांचा पराभव केला होताय. यावेळीही भाजपने प्रकाश भारसाकळे यांना परत उमेदवारी दिल्यास गणगणी विरुद्ध भारसाकळे अशी लढत पुन्हा होण्याची शक्यता आहेय.
हे ही वाचा