सुधीर मुनगंटीवारांचा विरोध डावलून अपक्ष आमदार किशोर जोरगेवारांचा भाजपमध्ये प्रवेश; चंद्रपुरातून उमेदवारीही फिक्स!
Maharashtra Assembly Election 2024 : चंद्रपूरचे (Chandrapur) अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांच्या भाजप पक्षातील प्रवेशावर आणि उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 चंद्रपूर: चंद्रपूरचे (Chandrapur) अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांच्या भाजप पक्षातील प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. मात्र, चंद्रपूर विधानसभेत बाहेरून आयात केलेल्या उमेदवाराला पक्ष प्रवेश देत पक्ष तिकीट देत असल्याने भाजप कार्यकर्ते नाराज होते. दरम्यान, स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना पक्ष श्रेष्ठीकडे पोहचवण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी थेट दिल्ली गाठली होती. यावेळी मुनगंटीवार यांना दिल्लीतील हायकमांडकडे दाद माग आपला विरोध असल्याचे बोलून दाखवले होते. तर दुसरीकडे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांना भेटून जोरगेवारांना पक्षप्रवेश आणि तिकीट देऊ नये, यासाठी मागणी केली होती. मात्र, सुधीर मुनगंटीवारांसह इतरांचा विरोध डावलून अपक्ष आमदार किशोर जोरगेवारांना भाजपने पक्षात प्रवेश दिला आहे. विशेष म्हणजे त्यांची चंद्रपुरातून उमेदवारीही फिक्स असल्याचे बोलले जात आहे.
पक्षप्रवेशासह उमेदवारीवरही शिक्कामोर्तब!
चंद्रपूर विधानसभेत बाहेरून आयात केलेल्या उमेदवाराला पक्ष तिकीट देत असल्याने भाजप कार्यकर्ते नाराज आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना पक्ष श्रेष्ठीकडे पोहचवण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. तर पक्षाने बृजभूषण पाझारे यांना तिकीट द्यावी, ही कार्यकर्त्यांची भावना असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. भारतीय जनता पक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना मैदानात ऊतरवू शकतो, अशी चर्चा असल्याने चंद्रपूर विधानसभेवरून भाजपमध्ये घमासान सुरू असल्याचेही बघायला मिळाले. मात्र हा विरोध डावलून अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना चंद्रपूर विधानसभेतून भाजपची उमेदवारी निश्चित झाली आहे. उद्या चंद्रपूर येथे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे जोरगेवार यांचा विरोध शांत करण्यात भाजप श्रेष्ठींना यश आले असले तरी मुनगंटीवार यांचा तीव्र विरोध आता खरच शमला आहे का? हे बघणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
कोण आहेत किशोर जोरगेवार?
चंद्रपूर हा विधानसभा मतदारसंघ अनूसुचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे. किशोर जोरगेवार हे 2019 मध्ये भाजप उमेदवाराचा पराभव करत विजयी झाले होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना किशोर जोरगेवार यांनी ठाकरेंना पाठिंबा दिला होता. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन होत असताना किशोर जोरगेवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. 2019 ला किशोर जोरगेवार यांनी भाजप उमेदवाराला पराभूत केलं होतं.
हे ही वाचा