Samarjeetsinh Ghatge : पालकमंत्र्यांचा मंदिरात बूथ, शपथा, लिंबू, लोकांना दमदाटी; अहो साहेब निदान मतदानाच्या दिवशी तरी देवाला सोडा! समरजित घाटगेंचा मुश्रीफांवर हल्लाबोल
Samarjeetsinh Ghatge : कागलमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 58.71 टक्के मतदान झालं आहे. मात्र, कागलमध्ये आज सकाळपासून बोगस मतदान आणि कार्यकर्त्यांना दमदाठी केल्याचा आरोप घाटगे यांच्याकडून केला जात आहे.
Samarjeetsinh Ghatge on Hasan Mushrif : कोल्हापूर जिल्ह्याचा राजकीय विद्यापीठ समाजाला जाणाऱ्या कागल विधानसभेला (Samarjeetsinh Ghatge on Hasan Mushrif) अत्यंत चुरशीचा लढा सुरू आहे. या मतदारसंघांमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे समरजितसिंह घाटगे यांच्यामध्ये तगडा मुकाबला होत आहे. या लढतीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलं आहे. कागलमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 58.71 टक्के मतदान झालं आहे. मात्र, कागलमध्ये आज सकाळपासून बोगस मतदान आणि कार्यकर्त्यांना दमदाठी केल्याचा आरोप घाटगे यांच्याकडून केला जात आहे.
मुमेवाडी येथे पालकमंत्र्यांचा मंदिरात बूथ...
— Raje Samarjeetsinh Ghatge (@ghatge_raje) November 20, 2024
शपथा, लिंबू, लोकांना दमदाटी..
अहो साहेब निदान मतदानाच्या दिवशी तरी देवाला सोडा.! pic.twitter.com/G22KRnhYBO
हो साहेब निदान मतदानाच्या दिवशी तरी देवाला सोडा.!
आज सकाळी पिराचीवाडीमध्ये आणि कागल शहरामध्ये बोगस मतदानाचा आरोप झाल्यानंतर आता समरजितसिंह घाटगे यांनी व्हिडिओ ट्विट करत मुमेवाडीमधील मंदिरामध्ये बुथ टाकल्याचा प्रकार समोर आणला आहे. दरम्यान, समरजित घाटगे यांनी मंदिरांमधील बूथ पाहून हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, मुमेवाडी येथे पालकमंत्र्यांचा मंदिरात बूथ... शपथा, लिंबू, लोकांना दमदाटी.. अहो साहेब निदान मतदानाच्या दिवशी तरी देवाला सोडा.!
पालकमंत्र्यांकडून दमदाटीचा प्रकार; समरजितसिंह घाटगेंचा गंभीर आरोप
दरम्यान, कागल मतदारसंघांमध्ये सकाळपासून मतदानाला उत्साहात प्रारंभ झाल्यानंतर घाटगे यांनी बोगस मतदानाचा आरोप केला. कागल शहरामध्ये आणि पिराचीवाडीमध्ये बोगस मतदानाचा प्रकार झाला असून तो प्रकार आपल्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडल्याचा आरोप समरजितसिंह घाटगे यांनी म्हटलं आहे. मुश्रीफ असंविधानिक पद्धतीने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील घाडगे यांनी केला. पालकमंत्र्यांकडून दमदाटी होत असल्याचा आरोप घाटगे यांनी केला आहे. घाटगे यांनी प्रशासनाला सुद्धा इशारा देत बोगस मतदानाचा प्रकार होऊ देऊ नये असं म्हटलं आहे. घाटगे यांनी सांगितले की कागल शहरातील एका मतदान केंद्रावर आपल्या कार्यकर्त्याच्या सतर्कतेमुळे बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला आहे. पिराचीवाडी गावामध्ये देखील आमच्या कार्यकर्त्यांना दमदाटीचा प्रकार घडला, याचा निषेध करत असल्याचे समरजित घाटगे यांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या