एक्स्प्लोर

'औरंगाबादची जागा घ्या, अहमदनगरची जागा द्या'; काँग्रेसने राष्ट्रवादीला प्रस्ताव दिल्याची चर्चा

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांना अहमदनगरच्या जागेवरुनच लोकसभा निवडणूक लढवायची आहे.

मुंबई : अहमदनगर लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसचे प्रयत्न अजूनही सुरुच आहेत. वादावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेससमोर नवा प्रस्ताव ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अहमदनगरच्या बदल्यात औरंगाबादची जागा घ्या असा प्रस्ताव काँग्रेसने राष्ट्रवादीला दिल्याची माहिती मिळत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांना अहमदनगरच्या जागेवरुनच लोकसभा निवडणूक लढवायची आहे. तर औरंगाबादच्या जागेसाठी आग्रही असलेली राष्ट्रवादी काँग्रेस अहमदनगरची जागा सोडण्यास मात्र तयार नाही. दुसरीकडे सुजय विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन अहमदनगरच्या जागेवर लोकसभा निवडणूक लढवण्याची चर्चा रंगली होती. परंतु सुजय विखे पाटील यांची राष्ट्रवादीमध्ये जाण्याची मानसिकता नाही. त्यामुळे औरंगाबाद आणि अहमदनगर या जागांची अदलाबदल करुन या मुद्द्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत आहे. मुलासाठी राधाकृष्ण विखे पाटलांचा आग्रह अहमदनगर मतदारसंघात डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी राधाकृष्ण विखे पाटील मागील अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत आहेत. परंतु विखे पाटील आणि पवार कुटुंबातील वैर यामुळे या जागेवर निर्णय झालेला नाही. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेससाठी सोडल्याची चर्चा सुरु होती. मात्र काँग्रेससाठी ही जागा सोडली नसल्याचं सांगत या जागेवर राष्ट्रवादीच लढणार असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. भाजप प्रवेशाची चर्चा, विखे पाटलांचं उत्तर तसंच सुजय पाटील भाजपमध्ये जाणार असल्याचीही चर्चा होती. यावर सुजय भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे, पण राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार संपूर्णतः त्यांनाच आहे, असं म्हणत राधाकृष्ण विखे-पाटलांनी एकप्रकारे सुजय यांच्या पक्षांतराचे संकेत दिले होते. संबंधित बातम्या सुजय विखे-पाटील भाजपच्या मार्गावर? राधाकृष्ण विखे-पाटील म्हणतात... सुजय विखे पाटील-रोहित पवार एकत्र, राजकीय वैर संपवून तिसऱ्या पिढीकडून मैत्रीचा नवा अध्याय? अहमदनगरची जागा काँग्रेससाठी सोडण्यास राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा विरोध राधाकृष्ण विखे पाटलांचे चिरंजीव भाजपात प्रवेश करणार? राधाकृष्ण विखे पाटील नाराज, महाआघाडीच्या दोन्ही मेळाव्याकडेही पाठ

महत्त्वाच्या बातम्या

बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
Zilla Parishad Election: राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Embed widget