(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vadgaon Sheri Assembly Election 2024 : मोठी बातमी! ....म्हणून मी हरलो, पराभवानंतर सुनील टिंगरे यांचा खळबळजनक दावा
Sunil Tingre : वडगाव शेरी मतदार संघात शरद पवार गटाच्या बापू पठारे यांनी अजित पवार गटाच्या सुनील टिंगरे यांचा पराभव केला. मात्र या पराभवानंतर सुनील टिंगरे यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
Vadgaon Sheri Assembly Election 2024 पुणे : वडगाव शेरी मतदार संघात शरद पवार गटाच्या बापू पठारे यांनी अजित पवार गटाच्या सुनील टिंगरे यांचा पराभव केला. मात्र या पराभवानंतर सुनील टिंगरे यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केलीय. पोर्षे कार प्रकरणावरून माझ्यावर सातत्याने टीका केली. माझी बदनामी करून विरोधकांनी फेक नरेटिव्ह सेट केला आणि त्याचा फटका मला बसलाय. त्या सोबतच मी शरद पवारांनी नोटीस न पाठवता तस सांगण्यात आलं. विकास काम नाही तर पैसा जिंकला, अशीही प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बोलताना दिलीये.
वडगाव शेरीतील निवडणूक सुरुवातीपासून चर्चेची ठरली होती. या मतदारसंघामध्ये भाजपसह राष्ट्रवादी उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना हा मतदारसंघ मिळवला मात्र, त्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी जगदीश मुळीक यांनी प्रयत्न केले. त्यांना पक्षाकडून एबी फॉर्म देखील मिळाला, मात्र त्यांनी तो भरला नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुळीक यांची समजूत काढली. त्यानंतर त्यांनी महायुतीचा धर्म पाळणार असल्याचं म्हटलं होतं. असे असले तरी या मतदारसंघात शरद पवार गटाच्या बापू पठारे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे.
निवडणुकीच्या प्रचारावेळी कल्याणीनगर भागातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोप, शरद पवारांना पाठवलेली नोटीस, ही प्रकरणे विरोधी पक्षांनी लावून धरली होती. त्यानंतर त्यांच्या मतदारसंघातील भाजपचे इच्छुक उमेदवार जगदीश मुळीक यांनी देखील टिंगरेंनी कल्याणीनगर अपघात प्रकरणावरून टीका केली होती, त्या प्रकरणांचा निवडणुकीत फरक पडल्याचे दिसून आले आहे.
बापू पठारे यांच्या विजयात सुरेंद्र पठारे किंगमेकर
विधानसभेच्या या लढाईत बापूसाहेब पठारे यांना मुलाची साथ लाभली ती म्हणजे मुलगा सुरेंद्र पठारे यांची. सुरेंद्र पठारे हे देखील मागील काही वर्षापासून वडगाव शेरीचा राजकारणात सक्रिय आहेत. या संपूर्ण परिसरात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. मतदारसंघातील प्रत्येक छोट्या मोठ्या कामात त्यांनी सहभाग घेत अडचणी सोडण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी आंदोलने ही केली आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले.
गेल्या काही वर्षांपासून सुरेंद्र पठारे यांनी मतदार संघात आपला जनसंपर्क वाढवत कामाला सुरूवात केली. प्रत्येक गोष्टीत सहभागी होत त्यांनी मतदार संघतल्या अडचणी जाणून घेतल्या व सोबतच पर्यायाने त्या सोडविण्यासाठी लढा उभारला आणि आंदोलने केली. पुण्यातील सीईओपी महाविद्यालयातील गोल्ड मेडलिस्ट असलेल्या सुरेंद्र पठारे यांनी मागील काही वर्षात संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. दीड महिन्यांपासून ते पायाला भिंगरी लागल्यासारखी फिरत होते. आणि त्याचा परिणाम विजयात झाला. वडील बापूसाहेब पठारे यांच्या गळ्यात त्यांनी विजयाची माळ घातली.
वडगाव शेरीचा मताधिक्य काय?
विजयी उमेदवार: बापूसाहेब पठारे
मतं: 1,33,689
पराभूत उमेदवार: सुनील टिंगरे
मतं: 1,28,979
मताधिक्य: 4710
हे ही वाचा