Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, एरंडोल, जळगाव शहर, अमळनेर या मतदारसंघांमधील बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारल्याचे दिसून आले आहे.
जळगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीने (Mahayuti) मोठी मुसंडी मारली. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसलाय. महायुतीचा 236 जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर यश मिळाले. तर यंदाच्या निवडणुकीत अनेक विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीत बंडखोरी झाल्याचे दिसून आले होते. जळगाव जिल्ह्यातील जनतेने बंडखोरीला थारा दिला नसल्याचं पाहायला मिळाले आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, एरंडोल, जळगाव शहर, अमळनेर या मतदारसंघांमधील बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारल्याचे दिसून आले आहे. माजी खासदार ए. टी. पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, अमोल शिंदे, माजी उपमहापौर अश्विन सोनवणे, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, अमळनेर येथील शिरीष चौधरी यांना मतदारांनी नाकारलं आहे.
बंडखोरांना सपशेल नाकारलं
निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात अपक्ष उमेदवारांनी काही प्रमाणात आव्हान निर्माण केल्याचे चित्र होते. पाचोरा, एरंडोल व अमळनेर या मतदारसंघांमध्ये बंडखोर उमेदवारांनी काही प्रमाणात झुंज दिली. मात्र, जळगाव शहरात तर एकही अपक्ष उमेदवाराला 8 हजार मतांचा टप्पा गाठता आला नाही. पाचोऱ्यात भाजपचे बंडखोर अमोल शिंदे यांचा शिंदेसेनेचे किशोर पाटील यांनी 60 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. हेच चित्र एरंडोल पारोळा मतदारसंघात पहायला मिळाले. भाजपचे बंडखोर उमेदवार माजी खासदार ए. टी. पाटील व शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर हर्षल माने हे तर स्पर्धेतदेखील टिकले नसल्याचे दिसून आले. पाचोरा मतदारसंघातील बंडखोर उमेदवार राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांनाही फारशी मते मिळू शकली नाहीत. जळगाव शहर मतदारसंघात भाजपचे डॉ. आश्विन सोनवणे यांनी तर शिवसेना ठाकरे गटाचे कूलभूषण पाटील यांनी बंडखोरी केली होती. मात्र, या दोन्ही उमेदवारांना मिळूनही 15 हजार मतांचा टप्पाही गाठता आलेला नाही. त्यामुळे जळगावमध्ये बंडखोरांना सपशेल नाकारल्याचे चित्र दिसून यात आहे.
जळगाव जिल्ह्यातील विजयी उमेदवारांची यादी
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ : सुरेश भोळे विजयी
सुरेश भोळे भाजप,
जयश्री महाजन शिवसेना ठाकरे गट,
कुलभूषण पाटील अपक्ष,
डॉ. अनुज पाटील मनसे
जामनेर विधानसभा मतदारसंघ : गिरीश महाजन विजयी
गिरीश महाजन, भाजप
दिलीप खोडपे
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ : गुलाबराव पाटील विजयी
गुलाबराव पाटील शिवसेना शिंदे गट,
गुलाबराव देवकर
अमळनेर विधानसभा मतदारसंघ : अनिल पाटील विजयी
अनिल पाटील
शिरीष चौधरी अपक्ष
पाचोरा विधानसभा मतदारसंघ : किशोर पाटील विजयी
किशोर पाटील, महायुती
वैशाली सूर्यवंशी, ठाकरे गट
दिलीप वाघ, अमोल शिंदे अपक्ष
एरंडोल विधानसभा मतदारसंघ : अमोल पाटील विजयी
अमोल चिमणराव पाटील शिवसेना
सतीश पाटील, शरद पवार गट
चोपडा विधानसभा मतदारसंघ : चंद्रकांत सोनावणे विजयी
चंद्रकांत सोनवणे शिवसेना
प्रभाकर सोनवणे शिवसेना ठाकरे गट
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ - मंगेश चव्हाण विजयी
मंगेश चव्हाण भाजप
उन्मेष पाटील शिवसेना ठाकरे गट
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ चंद्रकांत पाटील विजयी
चंद्रकांत पाटील, शिवसेना
रोहिणी खडसे शरद पवार गट
विनोद सोनवणे अपक्ष
भुसावळ विधानसभा मतदारसंघ : संजय सावकारे विजयी
संजय सावकारे भाजप
राजेश मानवतकर काँग्रेस
रावेर विधानसभा मतदारसंघ : अमोल जावळे विजयी
अमोल जावळे भाजप,
धनंजय चौधरी काँग्रेस
अनिल चौधरी प्रहार जनशक्ती पक्ष
शमिभा पाटील वंचित बहुजन आघाडी
कोणत्या पक्षाचा किती जागांवर विजय झाला?
महायुती- 236
मविआ- 49
इतर- 3
---------------------
भाजपा- 132
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
जन सुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1
अपक्ष- 2
आणखी वाचा