एक्स्प्लोर

"मला मारण्याचा कट, फोन आला म्हणून रस्ता बदलला, नाहीतर", सुजय विखेंनी सांगितलं रात्री काय घडलं?

गाड्या थांबवल्या गेल्या. दगड घेऊन फोडल्या गेल्या महिलांना हात धरून बाहेर ओढलं गेलं. आज सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यावर हा मला मारण्याचा पूर्वनियोजित कट होता हे समोर आल्याचे सुजय विखे म्हणाले.

अहमदनगर:  मला मारण्याचा कट होता असा खळबळजनक दावा भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी केला आहे.  वादग्रस्त वक्तव्याचा सुजय विखेंनी निषेध केलाय. मी त्यांना ताई म्हणून संबोधलं, त्यामुळे महिलांचा सन्मान व्हायलाच हवा असं सुजय विखेंनी म्हटलंय. मात्र ज्यांनी आमच्या गाड्या जाळल्या त्यांच्यावरही कारवाई करा अशी मागणी त्यांनी केलीय.

सुजय विखे म्हणाले, ते वक्तव्य निर्षेधार्ह आहे. संबधित व्यक्ती  त्या भागातील असल्याने त्यांना बोलावलं होतं. ते महायुतीच्या संबंधीत नव्हते.  स्थानिक असल्याने बोलवलं होत. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाही.   जर गुन्हा दाखल झाला असेल तर योग्य कारवाई करा, वक्तव्य केलं तो बाजूला राहिला, मात्र नंतर गाड्यांची तोडफोड, जाळपोळ केली.  हा मला मारण्यासाठी कट होता. त्यांच्या यंत्रणेतून फोन आला. रस्ता बदलला म्हणून मी वाचलो.मी सभेतून निघताना त्यांच्याच यंत्रणेतून मला एकाचा फोन आला, हे असं असं करणार आहेत.  तुम्ही या रस्त्याने येऊ नका दुसऱ्या रस्त्याने जा असं त्याने मला सांगितलं. मात्र मी जाण्याआधी ज्या गाड्या निघाल्या होत्या त्या यातून वाचू शकल्या नाही. माझ्यावरचा हल्ला माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर घेतला.. वक्तव्य करणाऱ्याला अटक करा माझं काही म्हणणं नाही.. मात्र सर्वसामान्य घरातील महिलांना रात्री गाडीतून बाहेर ओढून हल्ला करता  हे संगमनेरचं खरं चित्र आज महाराष्ट्रासमोर आले आहे.

मला मारण्याचा पूर्वनियोजित कट होता : सुजय विखे पाटील

वसंतराव देशमुख महायुतीचे घटक नाहीत. केवळ त्या गावातील  विरोधक म्हणून स्टेजवर आले होते. त्यांना भाषणाला कोणीही उठवलं नव्हतं ते स्वतःहून भाषणाला उठले. भाषण करताना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाही. अशा प्रकारच्या खालच्या पातळीचे टीका महायुती स्वीकार करत नाही. गुन्हा दाखल झाला असेल तर कारवाई करा असं देखील आम्ही पोलिसांना सांगितलं. मात्र हे सगळं घडल्यानंतर ज्याने वक्तव्य केलं तो बाजूला राहिला.  पुढच्या पंधरा मिनिटात त्या गावच्या वेशीवर  प्रत्येक ठिकाणी शंभर ते दीडशे जणांचा जमाव आला. गाड्या थांबवल्या गेल्या. दगड घेऊन फोडल्या गेल्या महिलांना हात धरून बाहेर ओढलं गेलं. आज सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यावर हा मला मारण्याचा पूर्वनियोजित कट होता हे समोर आल्याचे सुजय विखे म्हणाले.

कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन देखील मारहाण करणार होते , सुजय विखेंचा दावा

सुजय विखे म्हणाले,  आमच्या कोणत्या कोणत्या कार्यकर्त्यांवर काय गुन्हे दाखल झाले याचा आढावा अद्याप मी घेतला नाही. माझा कार्यकर्ता सुखरूप पोहोचला की नाही हे माझ्यासाठी काल महत्त्वाचं होतं. हे काही कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन देखील मारहाण करणार होते. ही खबर मला मिळाल्याने त्या कार्यकर्त्यांना घरी थांबू नका असा सल्ला मी दिला. संगमनेरचा जे नेतृत्व महाराष्ट्राला सुसंस्कृत दाखवण्याचा प्रयत्न करत होते ते काय आहेत आज महाराष्ट्र समोर आलं. 

राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात कोणी काही बोलले तर, सुजय विखेंचा दावा

आमच्या संकल्प सभा अशा सुरू राहणार आहे. आम्ही कोणतही पाप केलं नाही. मात्र सभेपूर्वी हल्ला करणाऱ्या आरोपींवर कारवाई झाली पाहिजे.. माननीय राधाकृष्ण विखे पाटील आल्यानंतर याबाबतचा पुढील निर्णय आम्ही घेऊ. मी रात्री बारा वाजताच स्टेटमेंट देऊन पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचं आवाहन केलं होतं.. गुन्हा दाखल केला गेलाय त्यांना शोधून पोलीस अटक करतील. हा वाद कोणी सुरू केला हे आपण पाहिला पाहिजे.. बाप हा शब्द कुठून आला.. कालच्या घटनेचा निषेध व्यक्त होतोय काही हरकत नाही.. मात्र परवा आमच्या मतदारसंघात येऊन माझ्याबद्दल हा मुलगा डोक्यावर पडलेला आहे, याला अक्कल नाही हा मूर्ख आहे असं बोललं गेलं. मात्र यापुढे शिर्डी मतदार संघात येऊन राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात कोणी काही बोलले तर त्याला जश्यास तसे उत्तर देऊ, असे सुजय विखे म्हणाले.

हे ही वाचा :

'सुजय मेलेल्या आईचा दूध प्यायलेला नाही, जशास तसे उत्तर देईल'; शालिनीताई विखे पाटील आक्रमक, Video

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Congress Candidate List: काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
Tuljapur VidhanSabha Election : राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bandra Railway Accident Special Report : प्रवाशांची गर्दी,चेंगरा-चेंगरी  वांद्रे स्टेशनवर काय घडलं?ABP Majha Headlines : 11 PM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 | टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा 27 OCT 2024 ABP MajhaMaha Vikas Aghadi Special Report : पुण्यात ठाकरे गटाची शरद पवार गटावर नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Congress Candidate List: काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
Tuljapur VidhanSabha Election : राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राष्ट्रवादीला जागा सुटली, जागा विकल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांची संजय राऊतांविरुद्ध घोषणाबाजी
राष्ट्रवादीला जागा सुटली, जागा विकल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांची संजय राऊतांविरुद्ध घोषणाबाजी
वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
नितेश राणेंविरुद्ध मुस्लीम नेत्यानं ठोकला शड्डू; सर्वधर्म समभावाचा संदेश देऊन विधानसभा लढणार
नितेश राणेंविरुद्ध मुस्लीम नेत्यानं ठोकला शड्डू; सर्वधर्म समभावाचा संदेश देऊन विधानसभा लढणार
Embed widget