एक्स्प्लोर

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ | सुधीर मुनगंटीवार प्रयत्नांती अनुकूल बनवलेला मतदारसंघ

राज्याचे अर्थमंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांचा बल्लारपूर हा मतदारसंघ. हा मतदारसंघ आस्तित्वात आल्यानंतरच्या दोन्ही निवडणुका मुनगंटीवारांनीच जिंकल्यात. पण आता चंद्रपूरची लोकसभा काँग्रेसने जिंकल्याने आणि बल्लारपूरमधून काँग्रेसला मताधिक्य असल्याने त्यांच्या काळजीत भर पडली असली तरी त्यांना आपल्या विजयाची खात्री आहे.

राज्याचे वित्तमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या बल्लारपूर मतदार संघात आगामी विधानसभेत अतिशय रंगतदार लढाई होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुधीर मुनगंटीवारांसारख्या मातब्बर उमेदवारासमोर विरोधकांचे आव्हान नव्हतं. त्यामुळे त्यांच्या विजयाबद्दल राजकीय पंडितांमध्ये उत्सुकता देखील नव्हती. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्हा हा सर्वार्थाने धक्कादायक निकाल देणारा ठरला आणि त्यामुळेच राज्यात जरी एकतर्फी लढाई दिसत असली तरी चंद्रपूर जिल्ह्यात लढत रंगतदार होणार यात शंकाच नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांच्या सारख्या मातब्बर नेत्याच्या मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराला मिळालेली 31 हजारांची आघाडी ही बरच काही सांगून जाते.
बल्लारपूर हा 2009 साली मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेला मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघाला इतिहास जरी मोठा नसला तरी या मतदारसंघाच्या जन्मामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शोभाताई फडणवीस यांचे नेतृत्व अस्ताला गेलं तर सुधीर मुनगंटीवार यांचं नेतृत्व उदयाला आलं. 2009 साली शोभाताई फडणवीस आमदार असलेल्या सावली मतदारसंघाचे विभाजन करून तो मतदारसंघ ब्रह्मपुरी आणि नव्याने तयार झालेल्या बल्लारपूर मतदारसंघात विलीन करण्यात करण्यात आला. त्याच वेळी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ हा राखीव झाल्याने आणि चंद्रपूर मतदारसंघाचा काही भाग बल्लारपूर मतदारसंघाला जोडण्यात आल्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूरवर दावा केला. शोभाताई फडणवीस यांच्या सावली मतदारसंघाचाही मोठा भाग हा नव्या बल्लारपूर मतदारसंघात आल्यामुळे शोभाताई फडणवीस यांनी देखील बल्लारपूरवर दावा केला. मात्र नितीन गडकरी यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या बाजूने कौल दिला. त्यांना उमेदवारी मिळाली.
नितीन गडकरी यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करत मुनगंटीवार यांनी 2009 ला राहुल पुगलिया यांचा 24 हजारांनी मतांनी तर 2014 ला घनश्याम मुलचंदानी यांचा 43 हजार मतांनी पराभव केला. सुधीर मुनगंटीवार यांनी मिळवलेले विजय हे मोठे असले तरी काँग्रेसचा या भागात अजूनही मोठा जनाधार आहे. मात्र सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात काँग्रेस पक्ष या भागात सक्षम उमेदवारच देऊ इच्छित नाही अशीच राजकीय वर्तुळात चर्चा आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत काँग्रेस च्या नेत्यांचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध यासाठी कारणीभूत असल्याचे मानलं जातं. 2014 साली घनश्याम मुलचंदानी यांच्या सारख्या बल्लारपूर शहराच्या बाहेर ओळख नसलेल्या उमेदवाराला काँग्रेसने ऐनवेळी उमेदवारी दिली. मोदी लाट आणि मुनगंटीवार यांच्या सारखा मातब्बर उमेदवार असतांना देखील काँग्रेसला तब्बल 60 हजार मते मिळाली. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला 31 हजारांची मिळालेली आघाडी म्हणजे कहरच म्हणावा लागेल.
लोकसभा निवडणुकीनंतर परिस्थिती काँग्रेससाठी अनुकूल असली तरी या मतदारसंघात अजूनही सुधीर मुनगंटीवार यांना टक्कर देऊ शकेल अशा उमेदवाराला प्रोजेक्ट करण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे किंवा काँग्रेसची तशी इच्छाच नाही. काँग्रेसची या मतदारसंघात लढण्याची इच्छा नसल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून बल्लारपूरसाठी दावेदारी दाखल केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य उमेदवारीसाठी इच्छुक असून त्यांनी या भागात जनसंपर्क देखील सुरु केला आहे.
जातीय समीकरणाच्या दृष्टीने पाहिल्यास कुठल्याच एका जातीचं या मतदारसंघात प्राबल्य नाही. या मतदारसंघात तेली, माळी, कुणबी, आदिवासी, दलित आणि हिंदी भाषिक हे जवळपास समसमान म्हणजे 35 ते 40 हजारांच्या घरात आहे. त्यामुळे एका विशिष्ट जातीचं कार्ड वापरून या भागात कुठलाच उमेदवार निवडून येऊ शकत नाही. जातीचं कार्ड कुचकामी असल्यामुळेच या वेळी सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधक OBC कार्ड चालविण्याची दाट शक्यता आहे. सोबतीला हंसराज अहिर यांच्या विरोधात वापरलेला दारूबंदीचा विवादास्पद मुद्दा मुनगंटीवार यांच्या विरोधात अधिक आक्रमकतेने पुढे आणल्या जाणार आहे. अहिर यांना दारूबंदीचा फटका बसला की नाही हा जरी मतभेदाचा मुद्दा असला तरी मुनगंटीवारांच्या विरोधातला प्रचार या एकाच मुद्द्यावर केंद्रित झाला तर आश्चर्य वाटायला नको. विरोधक एकीकडे दारूबंदी आणि OBC कार्ड खेळण्याच्या तयारीत असतांना भाजप मात्र राजू झोडे आणि बहुजन-वंचित आघाडीच्या माध्यमातून होणाऱ्या मतविभाजणी वर डोळा ठेवून आहे. बीआरएसपीचे राजू झोडे यांनी दलित आणि मुस्लिम समाजात स्वतःचा मोठा जनाधार तयार केलाय तर वंचित बहुजन आघाडीने देखील लोकसभेत 33 हजार मतं घेऊन सर्वांनाच बुचकळ्यात टाकलंय.
राज्य सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार यांना वित्तमंत्र्यासारखी अतिशय वजनदार जबाबदारी मिळाल्याने बल्लारपूर मतदारसंघात याचा दृष्य परिणाम दिसून येतो. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात इमारती, रस्ते, नाट्यगृहे, क्रीडांगणे आणि बगीच्यांची कामे करण्यात आली आहेत. बल्लारपूर येथे देशातील सर्वोत्तम असं सैनिक स्कूल पूर्णत्वास आलं आहे. उदबत्ती तयार करणे, बांबू कला आणि मधमाशी पालन या सारख्या प्रकल्पातून स्थानिकांना रोजगार देण्याचा प्रयत्न झालाय. मात्र असं असलं तरी बल्लारपूर पेपर मिल सारखा मोठा उद्योग डबघाईस आला आहे. मूल MIDC मध्ये नवीन उद्योग नाही तर पोंभुर्णा MIDC ची फक्त घोषणा झाली आहे. सिंचनाच्या दृष्टीने देखील झालेले काम फार समाधानकारक म्हणता येणार नाही.
विकासाच्या बाबतीत काय झाले आणि काय नाही ही चर्चा जरी अंतहीन असली तरी एका बाबतीत सुधीर मुनगंटीवारांना शंभर पैकी शंभर मार्क द्यावे लागतील आणि ते म्हणजे त्यांचे राजकीय कसब. मतदार संघ अनुकूल नसतांना देखील आपल्या विरोधात एकही सक्षम पर्याय त्यांनी निर्माण होऊ दिला नाही. डाव्या विचार सरणीच्या सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांचा भाजपसाठी नसला तरी स्वतः साठी भक्कम पाठिंबा मिळविला. पारोमिता यांच्या श्रमिक एल्गार संघटनेचा मिळणारा पाठिंबा ही मुनगंटीवार यांच्यासाठी जमेची बाजू आहे. विरोधकांच्या मतात कशी फूट पडेल याची देखील ते निवडणुकीत व्यवस्थित काळजी घेतात. त्यामुळे लोकसभेत काँग्रेसला मिळालेली 31 हजारांची आघाडी विरुध्द सुधीर मुनगंटीवार यांचे राजकीय कसब यामध्येच विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे.
विधानसभा 2014 
सुधीर मुनगंटीवार - भाजप - 103251 - आघाडी - 43334 घनशाम मुलचंदानी - काँग्रेस - 59927 मनोज आत्राम - गोंडवाना गणतंत्र पार्टी - 10299
लोकसभा 2019
बाळू धानोरकर - काँग्रेस - 96541-- आघाडी -- 31061 हंसराज अहिर - भाजप - 65480 राजेंद्र महाडोळे - वंचित बहुजन- 33759
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget