एक्स्प्लोर

Municipal Corporation Elections : राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार?

Municipal Corporation Elections : राज्यातील रखडलेल्या महापालिकेच्या निवडणुका या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होतील, अशा प्रकारचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

Municipal Corporation Elecitons : राज्यातील रखडलेल्या महापालिकेच्या निवडणुका (Municipal Corporation Election) नेमक्या कधी होणार? असा प्रश्न पडलेला असताना राज्यातील महापालिकेच्या निवडणुका या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होतील, अशा प्रकारचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात (Political Reservation for OBCs) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरु असून लवकरच त्याचा निकाल आल्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुका जाहीर होतील, अशी शक्यता वर्तवली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुका (Karnataka Assembly Elections 2023) झाल्या राज्यातील सत्ता संघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर झाला आणि आता ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात  रखडलेल्या महापालिकेच्या निवडणुका होतील अशी शक्यता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवली आहे. त्यामुळे सर्वच पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा त्यानुसार जोरदार तयारीला लागतील.

ऑगस्टमध्ये ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतच्या याचिकेवर निकाल अपेक्षित

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहे. जुलै महिन्यात पुढची तारीख आहे. त्यामुळे ऑगस्टपर्यंत निकाल येणे अपेक्षित असून त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात रखडलेल्या महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतील, असा अंदाज देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवला आहे. खरंतर महापालिकेच्या निवडणुका सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणखी पुढे ढकलल्या जातील अशी शक्यता वर्तवली जात होती.

तातडीने निवडणुका घेणं शिंदे-फडणवीस सरकारसाठी अनुकूल नाही?

कर्नाटक विधानसभा निवडणुकात झालेला भाजपचा पराभव आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाबद्दल उसळलेली सहानुभूतीची लाट...हे पाहता तातडीने निवडणुका घेणे हे सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारसाठी राजकीयदृष्ट्या अनुकूल वातावरण नसल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे रखडलेल्या राज्यातील 24 महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये जर जाहीर झाल्या तर तोपर्यंत राजकीयदृष्ट्या अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा सत्ताधाऱ्यांकडून केला जाईल.

महापालिका निवडणुकीत फायदा कोणाला?

ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यास तर अवघे पाच महिने हे सर्व पक्षांच्या हातात निवडणुकांच्या तयारीसाठी असणार आहेत. खरंतर निवडणुका जरी रखडलेल्या असल्या तरी अगदी तळागाळात जाऊन सर्वच पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता या सगळ्या आगामी महापालिका निवडणुकांमध्ये सहानुभूतीचा फायदा कितपत होतो आणि सत्ताधारी असल्याचा फायदा कशाप्रकारे उचलला जाईल हे निवडणुका जाहीर झाल्यानंतरच कळेल.

VIDEO : Devendra Fadnavis on MNC Elections : महापालिका निवडणुका ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget