एक्स्प्लोर
Advertisement
सोलापुरातील भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींचा अल्प परिचय
सोलापुरातील भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील मठाचे मठाधिपती आहेत. त्यांनी बनारस विद्यापीठातून धर्मशास्त्रात पीएचडी केलं.
सोलापूर : सोलापुरातून विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कट करुन भाजपने शिवाचार्यरत्न डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींना तिकीट दिलं आहे. सोलापुरात काँग्रेसचे माजी खासदार सुशीलकुमार शिंदे यांना महास्वामी तगडी टक्कर देतील अशी चर्चा आहे. त्यातच भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनीही सोलापुरातून शड्डू ठोकल्यामुळे सोलापुरातील लोकसभेची निवडणूक तिहेरी होईल.
भाजपने आपल्या पहिल्या उमेदवार यादीत सोलापूरची जागा वेटिंगवर ठेवली होती. मात्र आज जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत सोलापूरच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींच्या नावाची चर्चा होतीच, अखेर आज त्यावर शिक्कामोर्तब झालं.
धर्मगुरु डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींचा अल्पपरिचय
डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील मठाचे मठाधिपती आहेत. त्यांनी बनारस विद्यापीठातून धर्मशास्त्रात पीएचडी केलं.
गुरुसिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र ट्रस्टची स्थापना करुन ते सामाजिक कार्यात सहभागी झाले आहेत. सोलापुरात त्यांनी शाळा आणि महाविद्यालयांची स्थापना केली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहांची निर्मिती केली.
Loksabha Election 2019 : भाजपची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट
सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्येही त्यांचे असंख्य भक्त आहेत. कन्नड, मराठी, तेलुगू, हिंदी यासह अनेक भाषांवर प्रभुत्व असल्याने सर्व समाजातील लोकांशी महास्वामींचा संपर्क आहे. यापूर्वी जयसिद्धेश्वर यांचा राजकारणाशी काडीमात्र संबंध नव्हता. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांच्या नावाची कुजबूज होती. अखेर, यावेळी त्यांना भाजपतर्फे लोकसभेचं तिकीट देण्यात आलं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement