एक्स्प्लोर

वडिल बबन घोलपांनी नोटीस बजावताच मुलीकडून अर्ज मागे; देवळाली मतदारसंघात ट्विस्ट, कौटुंबिक कलह टळला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत उपनेतेपदाची जबाबदारी बबनराव घोलप यांच्याकडे होती.

नाशिक : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून बड्या नेत्यांच्या मध्यस्थीनंतर व शिष्टाईनंतर उमेदवारांकडून तलवार मान्य केली जात आहे. त्यातच, नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघातून चक्क भावाविरुद्ध बहिणीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिवसेना शिंदे गटाला जय महाराष्ट्र करत मशाल हाती घेतली होती. त्यानंतर, शिवसेना ठाकरे पक्षाकडून त्यांच्या मुलाला विधानसभेची उमेदवारीही जाहीर झाली. महायुतीत नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघातून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीने विद्यमान आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने माजी आमदार योगेश घोलप (Yogesh Gholap) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, येथून त्यांच्या बहिणीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अखेर भाऊबीजेच्या दुसऱ्यादिवशी त्यांनी अर्ज माघारी घेतला आहे.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत उपनेतेपदाची जबाबदारी बबनराव घोलप यांच्याकडे होती. मात्र, त्यांनी राजीनामा देत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. पण, त्यांच्या कन्या तनुजा घोलप यांनी महायुतीसोबतच राहणे पसंत केले. विशेष म्हणजे देवळाली विधानसभा मतदारसंघातून चक्क आपल्या भावाविरुद्धच उमेदवारी अर्ज भरला होता, अखेर त्यांनी अर्ज मागे घेतला आहे. तुनजा यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने त्यांना कौटुंबिक कलहाचा सामना करावा लागला होता.  त्यामुळे, अर्ज माघारी घेताना तनुजा घोलप भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. कारण, येथील मतदारसंघातून तनुजा घोलप यांचे बंधू योगेश घोलपही हेही महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळेच, कौटुंबिक वाद त्यांच्या उमेदवारीने उफाळून आला होता. विशेष म्हणजे त्यांचे वडिल बबनराव घोलप यांनी थेट कायदेशीर नोटीसच मुलीला पाठवली होती. तुमचं लग्न झालेलं असल्याने तुम्ही माहेरचे नाव लावू नये, तुम्ही सासरचे नाव लावावे, अशा आशयाची नोटीस बबन घोलप यांनी त्यांच्या मुलीला बजावली होती. 

माझ्या जन्मदाखल्यावर वडिलांचे नाव

माझ्या भावाला निवडणुकीसाठी बहीण म्हणून शुभेच्छा देते. मात्र, महायुतीतच राहून महायुतीचं काम करणार असल्याची भूमिका तनुजा घोलप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर व्यक्त केली. तसेच, वडिलांनी पाठवलेल्या नोटीससंदर्भातही त्यांनी प्रतिक्रिया दिली. माझ्या जन्मदाखल्यावर आजही तनुजा बबनराव घोलप नाव असल्याने तेच वापरणार असल्याची तनुजा घोलप यांची भूमिका आहे. मात्र, वडिलांनी केलेल्या टीकेला कुठलेही उत्तर देणार नाही, पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आश्वासनानंतरच आपण माघार घेत असल्याचे तनुजा घोलप यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा

सुनील शेळकेंचा गेम होणार?, मावळ पॅटर्नला राज ठाकरेंचाही मनसे पाठिंबा; बाळू भेगडेंनी घेतली भेट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले

व्हिडीओ

Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी
Raj Uddhav And Kiyan Thackeray:राज-उद्धव आजोबांच्या गप्पांमध्ये नातवाची एन्ट्री; पाहा पुढे काय झालं
Cash Bomb Politics : राजकीय बंडलबाजी, महापुरुषांवरुन टोलेबाजी; स्तुती करताय की टीका Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
Embed widget