एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवसेना-भाजप युतीची बोलणी अंतिम टप्प्यात, लवकरच घोषणा : चंद्रकांत पाटील
युतीसंदर्भात बोलणी अंतिम टप्प्यात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसआणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेचं याची घोषणा करतील.
मुंबई : शिवसेना-भाजप युतीसंदर्भातील बोलणी दोन्ही पक्षांत अंतिम टप्प्यात असून लवकरच याबाबतची घोषणा करण्याच येईल अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी दिली आहे. विधानसभा प्रचाराच्या पुढच्या कार्यक्रमाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
युतीच्या जागावाटपासंदर्भात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा सुरु असून बोलणी शेवटच्या टप्प्यात आहे. लवकरच याची घोषणा होईल असं चंद्रकांत पाटील म्हणाले. युतीच्या घोषणेवर मी कॉलेजनंतर भविष्य सांगणं सोडलं आहे. देवेंद्र फडणीस आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांची अमित शाहांशी अधूनमधून चर्चा सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच याची घोषणा करतील.
राणेंच्या पक्षप्रवेशाबद्दल मौन
नारायण राणेवर चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर बोलण टाळलं. तर राणेंचा प्रवेश हा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला विश्वासात घेऊनच करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
संजय राऊतांच्या वक्तव्यावर चोख प्रत्युत्तर
2014 ला विरोधात बसलो असतो तर आज परिस्थीती वेगळी असती असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी आता याविषयी चर्चा करण्यात काही अर्थ नाही. तेव्हाच विरोधात बसायला पाहिजे होतं असं म्हणतं राऊतांना चोख उत्तर दिलं आहे. तसेच संजय राऊत खूप चांगले लेखक आहे, त्यामुळे त्यांना बरंच काही चांगले सुचतं असंही ते म्हणाले.
VIDEO | युती झाली नाही तर शिवसेनेची 'एकला चलो रे' ची तयारी सुरु, स्वबळाच्या चाचपणीसाठी नागपुरात मेळावा | ABP Majha
लोकसभेवेळी दिलेला शब्द भाजपनं पाळावा : संजय राऊत
लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपनं शिवसेनेला शब्द दिला होता. तो आता पाळला जातो का हे पाहणं महत्वाचं आहे. जर भाजप शब्दावर ठाम नसेल तर त्यांना आत्मपरीक्षणाची गरज आहे, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना दिले आहे. तसेच राऊतांनी भाजपला जुन्या फॉर्म्यल्याची आठवण करुन दिली आहे.
VIDEO | 'भाजप शब्दावर ठाम नसेल तर आत्मपरीक्षणाची गरज', लोकसभेच्या फॉर्म्युल्याची संजय राऊतांकडून आठवण | ABP Majha
दरम्यान शिवसेना-भाजप युतीचं घोडं अवघ्या 10 जागांमुळे अडल्याची सूत्रांची माहिती आहे. काल उशिरा रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी तब्बल साडेतीन तास चाललेल्या बैठकीत युतीच्या जागांबाबत तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे युतीच्या घोषणेचा आजचा मुहूर्त पुन्हा एकदा टळला आहे.
तसेच पक्षांतर बंडाळी टाळण्यासाठी युतीची घोषणा लांबणीवर पडल्याचं आणखी एक प्रमुख कारण सांगितलं जात आहे. युती नाही झाली तर दोन्ही पक्षातील इच्छूक उमेदवारांना एका जागेवर संधी मिळू शकते. मात्र युती झाल्यास एका पक्षातील इच्छूक उमेदवाराला त्या जागेवर पाणी सोडावं लागेल. त्यामुळे नाराजीनाट्य, बंडखोरी किंवा पक्षांतरणामुळे भाजप-शिवसेनेच्या नेत्यांची डोकेदुखी वाढू शकते. त्यामुळे पक्षाचे एबी (AB) फॉर्म वाटप करताना वाद टाळण्यासाठी युतीच्या घोषणेची घाई नको, असा सूर वरिष्ठ पातळीवर असल्याचं कळतंय.
VIDEO | शिवसेना-भाजप युतीच्या घोषणेचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर | ABP Majha
संबंधित बातम्या
- भाजपाध्यक्ष अमित शाह 26 तारखेला पुन्हा मुंबई दौऱ्यावर, दोन दिवसात युतीचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता
- भाजप-शिवसेना युतीसाठी चर्चेत असणारे हेच ते 5 जागावाटप फॉर्म्युले!
- लोकसभेत युतीसाठी मातोश्रीची पायरी चढणारे अमित शाह आगामी विधानसभेत युतीच्या चर्चेत मध्यस्थी करणार का?
- भाजपाध्यक्ष अमित शाह 26 तारखेला पुन्हा मुंबई दौऱ्यावर, दोन दिवसात युतीचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता
- युतीचा फॉर्म्युला लोकसभेवेळीच ठरला आहे : उद्धव ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement