एक्स्प्लोर
Advertisement
साताऱ्यातील दोन राजेंची दिलजमाई, पवारांच्या मध्यस्थीने उदयनराजे-शिवेंद्रराजेंचं मनोमिलन
नेत्यांमधला विसंवाद दूर करण्यासाठी शरद पवारांनी मुंबईत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचं मनोमीलन करण्यात पवारांना यश आलं.
मुंबई : पक्षांतर्गत धुसफूस थांबवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कंबर कसली आहे. पवारांनी आयोजित केलेल्या बैठकीत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची दिलजमाई झाली आहे.
नेत्यांमधला विसंवाद दूर करण्यासाठी शरद पवारांनी मुंबईत बैठक आयोजित केली होती. त्यासाठी खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचं मनोमीलन करण्यात पवारांना यश आलं.
एकदिलाने निवडणूक लढण्यास उदयनराजे आणि शिवेंद्रराजे तयार झाल्याची माहिती आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडलेल्या बैठकीला शरद पवारांसह अजित पवार, जयंत पाटील यासारखे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
VIDEO | पवारांच्या मध्यस्थीने उदयनराजे-शिवेंद्रराजेंचं मनोमिलन | सातारा | एबीपी माझा
साताऱ्यातील लोकसभेची जागा उदयनराजेंना सोडायला जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध होता. मात्र लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतर्गत धुसफूस कमी करण्यात पवारांना यश आलं.
उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम करावं आणि विधानसभा निवडणुकीतही मदत करावी अशी अपेक्षा आमदारांनी व्यक्त केली.
साताऱ्याच्या या दोन राजांनी एकत्र यावं, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. शरद पवार यांनी अलिकडेच,डोकं शांत ठेवा, असा सल्ला त्यांना दिला होता
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement