एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सर्वोच्च न्यायालयाचा तो खटला आठवत असेल, शरद पवारांकडून 50 वर्ष जुन्या पवार-विखे संघर्षाची आठवण
"सर्वोच्च न्यायालयाचा तो खटला आठवत असेल," असं म्हणत शरद पवारांनी विखे-पवार संघर्षाची आठवण करुन दिली. पुण्यात सोमवारी (11 मार्च) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुणे : अहमदनगरच्या लोकसभा जागेवरुन काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसही ही जागा सोडण्यास तयार नाही. विशेष म्हणजे स्वत: शरद पवार यांनीही कोणत्याही परिस्थितीत काँग्रेनसाठी नगरची जागा सोडणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. "सर्वोच्च न्यायालयाचा तो खटला आठवत असेल," असं म्हणत शरद पवारांनी विखे-पवार संघर्षाची आठवण करुन दिली. पुण्यात सोमवारी (11 मार्च) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अहमदनगरच्या जागेबाबत शरद पवार म्हणाले की, "या ठिकाणी राष्ट्रवादीचेच उमेदवार उभे राहतील. यात निवडून येण्याचा वाद नाही. याच मतदारसंघामध्ये विखे म्हणजे बाळासाहेब विखे हयात नाहीत, त्यांचा पराभव आम्ही लोकांनीच केला होता. त्यावेळी निवडणुकीची जबाबदारी माझ्यावरच होती आणि त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी माझ्यावर केसही केलेली होती. त्यामध्ये माझा कॉन्स्टिट्यूशनल राईट्ससुद्धा रद्द केला होता. शेवटी सुप्रीम कोर्टात मला न्याय मिळाला. त्यामुळे ही सीट आम्ही जिंकू शकतो. ती जागा काँग्रेसकडे असतानाही विजय झाला नाही हा सुद्धा इतिहास आहे."
पवार-विखे यांचा 50 वर्षांपेक्षाही जुना संघर्ष
* शरद पवार राजकारणात आले तेव्हा, काँग्रेसमध्ये बाळासाहेब विखे पाटील गटाचं वजन होतं.
* नंतर शरद पवारांनी विखेंच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी रणनीती आखली
* यशवंतराव गडाख, रामराव आदिक, मधुकर पिचड यांना स्वतःसोबत आणलं
* 1991 साली बाळासाहेब विखे यांचा लोकसभेचा पत्ता कापला गेला.
* बाळासाहेब विखे अपक्ष उभे राहिले, पवारांनी विखेंविरोधात यशवंतराव गडाखांना उभं केलं
* अटीतटीच्या लढाईत बाळासाहेब विखे पाटलांचा पराभव झाला
* चारित्र्यहननाच्या आरोपात बाळासाहेब कोर्टात गेले. शरद पवार, यशवंतराव गडाखांविरोधात खटला चालला
* हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं, यशवंतराव गडाखांना सहा वर्ष निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात आली.
* न्यायालयाने शरद पवारांवरही ठपका ठेवत, त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला
* काही काळाने सर्वोच्च न्यायालयाकडून शरद पवारांना या प्रकरणातून दिलासा मिळाला.
VIDEO | माढ्यात अगतिकतेतून माघार, शरद पवारांचा स्वार्थ, पार्थ आणि परमार्थ
अंतर्मनाचा आवाज ऐकून पुढची भूमिका ठरवावी लागेल : विखे पाटील
अहमदनगरच्या जागेचा तिढा सुटत नसल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील नाराज आहेत. अंतर्मनाचा आवाज ऐकून पुढची भूमिका ठरवावी लागेल, असा गर्भित इशारा विखे पाटलांनी दिला. विखे पाटील दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या भेटीला गेले होते. सुजय विखे पाटील राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्यास तयार नसल्याची माहिती आहे. काँग्रेसमधून तिकीट न दिल्यास वेगळा विचार करण्याचा त्यांचा पवित्रा आहे. सुजय यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवरुन राधाकृष्ण विखे पाटलांना हायकमांडचं बोलावणं आलं होतं. अहमदनगरची जागा सुटत नसल्यामुळे विखे पाटलांची नाराजी आहे. पक्षातल्या अंतर्गत राजकारणाबद्दलही त्यांनी हायकमांडकडे तक्रार केली. विरोधी पक्षनेत्याची ही अवस्था होत असेल तर इतरांना काय सांगायचं? अशी उद्विग्न प्रतिक्रिया विखे पाटलांनी राहुल गांधींकडे व्यक्त केली.
संबंधित बातम्या :
सुजय विखे पाटील भाजपच्या वाटेवर, तर राधाकृष्ण विखे पाटील...
आघाडीतील अहमदनगरचा तिढा सोडवण्यासाठी राहुल गांधी मध्यस्थी करणार
सुजय विखे पाटील राष्ट्रवादीकडून अहमदनगर लोकसभेची जागा लढवणार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement