Sharad Pawar In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात उद्या शरद पवारांच्या सभांचा धडाका; हसन मुश्रीफ पुन्हा टार्गेटवर असणार!
Sharad Pawar In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तीन उमेदवारांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या सभांचा धडाका उद्या कोल्हापूरमध्ये असणार आहे.
Sharad Pawar In Kolhapur : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा झंझावाती दौरा उद्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पोहोचणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तीन उमेदवारांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या सभांचा धडाका उद्या कोल्हापूरमध्ये असणार आहे. अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांच्याविरोधात शरद पवारांची तोफ कशी धडाडणार? याकडे राजकीय वर्तुळाचे सर्वाधिक लक्ष असेल.
हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शरद पवार काय बोलणार?
शरद पवार यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये कोल्हापूर दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये त्यांनी चार दिवस कोल्हापूरमध्ये मुक्काम करत राजकीय जोडण्या लावल्या होत्या. या दौऱ्यामध्ये मुश्रीफ यांच्या विरोधात समरजितसिंह घाटगे यांना पक्षामध्ये घेत त्यांना कागलमध्ये उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कागलमध्ये तगडी फाईट होत आहे. त्यामुळे उद्याच्या प्रचार सभेमध्ये हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शरद पवार काय बोलतात याची उत्सुकता आहे.
शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला कागल, चंदगड आणि इचलकरंजी
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला कागल, चंदगड आणि इचलकरंजी असे तीन मतदारसंघ आले आहेत. चंदगडमध्ये स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या नंदाताई बाभूळकर रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात अप्पी पाटील यांनी बंडखोरी केली आहे. नंदिनी बाभूळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार राजेश पाटील रिंगणात आहेत. जनसुराज्यकडून मानसिंग खोराटे यांनीही बंडखोरी केली आहे. भाजपच्या शिवाजी पाटील यांनी सुद्धा बंडखोरी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये आव्हान वाढलं आहे.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून राहुल आवाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मदन कारंडे आहेत. गेल्या काही दिवसांपासून आवाडे यांच्यासाठी निवडणूक सोपी मानली जात होती. मात्र मदन कारंडे यांनी सुद्धा मतदारसंघ पिंजून काढत आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे प्रचाराच्या उत्तरार्धात शरद पवार यांची सभा सुद्धा त्या ठिकाणी होत असल्याने चुरस आणखी वाढणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या