एक्स्प्लोर

शिंदे बंधूंच्या बालेकिल्ल्यात आज पवारांची तोफ धडाडणार, मोहिते पाटलांसाठी खुद्द पवारच मैदानात

धैर्यशील मोहिते पाटलांच्या (Dhairyasheel mohite patil) प्रचारासाठी आज माढा तालुक्यातील मोडनिंबमध्ये शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. 

Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या बड्या नेत्यांच्या सभा सुरु आहेत. अशातच माढा लोकसभा (Madha Loksabha) मतदारसंघाची देखील जोरदार चर्चा सुरु आहे. शरद पवार (Sharad pawar) गटाकडून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणं धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel mohite patil) निवडणूक लढवत आहेत. मोहिते पाटलांच्या प्रचारासाठी आज माढा तालुक्यातील मोडनिंबमध्ये शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. 

माढा तालुक्यात शिंदे बंधुंचं वर्चस्व 

माढा तालुक्यात आमदार बबनदादा शिंदे (Babandada Shinde) आणि त्यांचे बंधू आमदार संजयमामा शिंदे (Sanjaymama shinde) यांचेवर्चस्व आहे. या दोन्ही बंधुंनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर प्रथमच शरद पवार यांची माढा तालुक्यात एखादी राजकीय सभा पार पडत आहे. त्यामुळं शरद पवार आज नेमकं काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. 

धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी खुद्द शरद पवार मैदानात

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा एकदा रणजितसिंह निंबाळकरांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळं मोहिते पाटील नाराज होते. धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, त्यांना भाजपनं डावलले. निंबाळकरांनाच भाजपनं पुन्हा एकदा रिंगणात उतरवलं आहे. त्यानंतर मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करत हाती तुतारी घेत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं माढा लोकसभेची राजकीय गणितं बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खुद्द शरद पवार हे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे.  

भाजपचे नेते संजय क्षीरसागर हे शरद पवार गटात प्रवेश करणार 

दरम्यान, थोड्याच वेळात शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी मोडनिंबमध्ये येणार आहेत. सुरुवातीपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धक्क्यावर धक्के देत असलेले पवार आजच्या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. दरम्यान, मोडनिंब येथील सभा झाल्यावर शरद पवार हे मोहोळ येथे सभा घेणार आहेत. मोहोळमध्ये भाजपचे नेते संजय क्षीरसागर हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

फडणवीसांना धक्का, अजित पवारांशी बंडखोरी; फलटणमध्ये नारळ फुटला, मोहिते पाटलांसाठी तुतारीही वाजली

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
Legislative Council Elections : विधान परिषदेच्या 17 जागांसाठी बिगुल वाजणार! पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता
विधान परिषदेच्या 17 जागांसाठी बिगुल वाजणार! पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता
Vivek Oberoi Shares Post On Sunetra Pawar: 'सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो...'; बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयची सुनेत्रा पवार यांच्यासाठी मराठीतून पोस्ट
'सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो...'; विवेक ओबेरॉयची सुनेत्रा पवार यांच्यासाठी मराठीतून पोस्ट
Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mandana Karimi Leaves India After 16 Years: 16 वर्षांनंतर, 37 वर्षांच्या इराणी अभिनेत्रीनं सोडला भारत; म्हणाली, 'इथे घरासारखं वाटत नाही...'
16 वर्षांनंतर, 37 वर्षांच्या इराणी अभिनेत्रीनं सोडला भारत; म्हणाली, 'इथे घरासारखं वाटत नाही...'
Sunil Tatkare Meets Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून नाव गायब; शरद पवारांच्या भेटीनंतर सुनील तटकरे म्हणाले..., मला काही बोलायचं नाही!
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून नाव गायब; शरद पवारांच्या भेटीनंतर तटकरे म्हणाले...
Nashik TCS Case Matin Patel : मोठी बातमी! निदा खानला आश्रय देणं MIM नगरसेवकाला भोवलं; मतीन पटेलांच्या घरावर बुलडोझर कारवाई, नगरसेवक पदावरही गंडांतर येण्याची शक्यता
मोठी बातमी! निदा खानला आश्रय देणं MIM नगरसेवकाला भोवलं; मतीन पटेलांच्या घरावर बुलडोझर कारवाई, नगरसेवक पदावरही गंडांतर येण्याची शक्यता
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
Embed widget