एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
"जिंकलो नसलो तरी मी अजून हरलो नाही", शरद पवारांची इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट
शरद पवारांनी इन्स्टाग्रामवर ‘जिंकलो नसलो तरी हरलो नाही’ या आशयाची पोस्ट टाकली आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नाही. निकालानंतर शरद पवारांनी इन्स्टाग्रामवर ‘जिंकलो नसलो तरी हरलो नाही’ या आशयाची पोस्ट टाकून कार्यकर्त्यांना न खचण्याचं आवाहन केलं आहे.
पवारांचा बालेकिल्ला असलेला बारामती मतदारसंघ राष्ट्रवादीला राखता आला असला तरीही भाजपच्या कांचन कुल यांनी निवडणुकीत कडवी झुंज दिली आहे. पार्थ पवारांच्या मावळमधील पराभवाने पवारांच्या कुटुंबाने पहिल्यांदाच हार पाहिली आहे. त्यामुळेच थकलो आहे जरी, तरी अजून झुकलो नाही आणि जिंकलो नसलो तरी अजून ही हरलो नाही, अशा आशयाची ही पोस्ट पवारांनी टाकली आहे.
'बारामती' जिंकण्याच्या भाजपच्या वल्गना फोल ठरवत बारामतीचा गड राखण्यात राष्ट्रवादीला यश आलं. सुप्रिया सुळे पुन्हा एकदा बारामतीतून खासदारपदी निवडून आल्या आहेत. भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना पराभवाचा सामना करावा लागला. बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे सलग तिसऱ्यांदा खासदारपदी निवडून आल्या आहेत. सुप्रिया सुळे यावेळी लोकसभा निवडणुकीत नक्की हरणार, असा दावा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही बारामतीची जागा जिंकण्याचा प्रबळ विश्वास व्यक्त केला होता. मात्र जवळपास लाखभर मतांची आघाडी घेत सुप्रिया सुळे यांनी बारामतीचा गड राखला. या मतदारसंघात 10 अपक्ष उमेदवारांसह एकूण 18 जण निवडणुकीच्या रिंगणात होते. बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी यंदा भाजपकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांनी बारामतीत प्रचार केला.
शरद पवारांनी आपला नातू पार्थ पवार यांच्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली होती. पार्थ पवार यांना लोकसभेसाठी मावळमधून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र श्रीरंग बारणेंनी पार्थ पवारांचा पराभव करत आपली खासदारकी कायम ठेवली आहे.
शरद पवार यांची राजकीय कारकीर्द तब्बल 50 वर्षांची आहे. “आतापर्यंत लढलेल्या 14 ते 15 निवडणुकीत माझा एकदाही पराभव झालेला नाही”, असं स्वत: शरद पवार सांगतात. इतकंच काय पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि पुतणे अजित पवार यांनीही पराभव पाहिला नाही. परंतु पार्थ पवार यांच्या रुपाने पवार कुटुंबाला पहिल्यांदाच पराभवाची चव चाखावी लागली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement