एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Election Voting 2024: परळी विधानसभा मतदारसंघात जोरदार राडा, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण

Parli Vidhan Sabha Election 2024 : परळी शहरातील मतदान केंद्रावर उमेदवार मतदान केंद्रातील माहिती घेत असताना शरद पवार गटाचे नेते ऍड माधव जाधव यांना तीन ते चार जणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election : गेल्या कित्येक दिवसांपासून उत्सुकता लागलेला दिवस अखेर उजाडला असून राज्यातील 288 विधानसभा (Vidhansabha) मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार, काही अपवाद वगळता जवळ जवळ सर्वच मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केल्याचे चित्र आहे. तर बहुतांश ठिकाणी शांततेत मतदान सुरू असताना काही ठिकाणी काही किरकोळ वाद झाल्याचेही प्रकरण पुढे आले आहे. 

अशातच, परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये बोगस मतदान होत असल्याची तक्रार शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे. याच दरम्यान परळी शहरातील बँक कॉलनी परिसरामध्ये असलेल्या मतदान केंद्रावर उमेदवार मतदान केंद्रातील माहिती घेत असताना ऍडव्होकेट माधव जाधव यांना तीन ते चार जणांनी मारहाण केली आहे. असा एक व्हिडिओ सध्या पुढे आल्याचे बघायला मिळत आहे. मतदान केंद्राबाहेर उभे असताना ऍड. माधव जाधव यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत. दरम्यान या प्रकरणामुळे परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये काहीसा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

मारहाण झाल्यानंतर मतदान केंद्राची तोडफोड 

राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना परळी मध्ये मारहाण झाल्यानंतर त्याची पडसाद परळी विधानसभा मतदारसंघातील घाटनांदुर या ठिकाणी झाले. घटनांदूर मधील मतदान केंद्रा मध्ये मतदान चालू असतानाच काही कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात घुसून मतदान केंद्र कोंड्याची घटना घडली आहे काही काळ यामुळे या ठिकाणचे मतदान थांबवण्यात आला आहे  

सर्व प्रमुख उमेदवारांना पोलीस संरक्षण द्या - धनंजय मुंडे

राज्यात विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडतअसून, त्या अनुषंगाने परळी विधानसभेचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी परळीतील सर्व प्रमुख उमेदवारांना पोलीस संरक्षण आणि शासकीय कॅमेरा सर्व्हेलन्स देण्यात यावे, अशी आगळी वेगळी मागणी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. 

परळीतील प्रत्येक निवडणूक अत्यंत शांततेत पार पडते, मात्र मागील काही वर्षांचा अनुभव पाहता काही उमेदवार व कार्यकर्ते आम्हाला अडवणूक झाली, मारहाण झाली, हल्ला झाला, अशा स्वरूपाच्या अफवा पसरवून संभ्रम निर्माण करत असतात. त्यात काहीच तथ्य नसते, परंतु त्यातून परळी व पर्यायाने बीड जिल्ह्याची बदनामी होते, त्यामुळे सर्वच प्रमुख उमेदवारांसाठी पोलीस संरक्षण व कॅमेरा सर्व्हेलन्स देण्यात यावे, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले होते. 

निवडणूक प्रक्रिया म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे, संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, मतदानाचा टक्का वाढावा, यासाठीही व्यापक प्रयत्न व्हावेत. कुठेही काही अनुचित प्रकार घडू नये, तसेच असा काही प्रकार घडल्यास त्याचे चित्रीकरण केल्याने पोलिसांकडे दोषसिद्धी साठी ठोस पुरावा हातात असेल, त्यामुळे पोलीस संरक्षण व शासकीय कॅमेरामन सर्व प्रमुख उमेदवारांच्या सोबत असावा, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
सोलापूर महापालिकेतील बिग फाईट; आमदारपुत्र अन् बंधू मैदानात, सरवदेंचा खून झालेल्या प्रभागात काय होणार?
सोलापूर महापालिकेतील बिग फाईट; आमदारपुत्र अन् बंधू मैदानात, सरवदेंचा खून झालेल्या प्रभागात काय होणार?
Ajit Pawar : महेश लांडगे नासका आंबा, भारंदाज डाव टाकून फिरवून फेकून दिला नाही तर पवारांची औलाद नाही : अजित पवार
महेश लांडगे नासका आंबा, भारंदाज डाव टाकून फिरवून फेकून दिला नाही तर पवारांची औलाद नाही : अजित पवार

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
सोलापूर महापालिकेतील बिग फाईट; आमदारपुत्र अन् बंधू मैदानात, सरवदेंचा खून झालेल्या प्रभागात काय होणार?
सोलापूर महापालिकेतील बिग फाईट; आमदारपुत्र अन् बंधू मैदानात, सरवदेंचा खून झालेल्या प्रभागात काय होणार?
Ajit Pawar : महेश लांडगे नासका आंबा, भारंदाज डाव टाकून फिरवून फेकून दिला नाही तर पवारांची औलाद नाही : अजित पवार
महेश लांडगे नासका आंबा, भारंदाज डाव टाकून फिरवून फेकून दिला नाही तर पवारांची औलाद नाही : अजित पवार
Devendra Fadnavis and Ajit Pawar: पुण्यातील शेवटच्या प्रचारसभेतही देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना सोडलं नाही, म्हणाले, 'खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा'
पुण्यातील शेवटच्या प्रचारसभेतही देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना सोडलं नाही, म्हणाले, 'खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा'
Nashik Election 2026: 'आप'च्या उमेदवारावर रोखलेली 'ती' बंदूक नव्हे तर लायटर; परस्पर विरोधी गुन्हा दाखल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
'आप'च्या उमेदवारावर रोखलेली 'ती' बंदूक नव्हे तर लायटर; परस्पर विरोधी गुन्हा दाखल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray: प्रचंड खुर्च्यांसमोर मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं; खुर्च्यांचा प्रचंड प्रतिसाद होता, उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मोकळ्या खुर्च्यांच्या व्हायरल व्हिडीओवरून डिवचलं
प्रचंड खुर्च्यांसमोर मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं; खुर्च्यांचा प्रचंड प्रतिसाद होता, उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मोकळ्या खुर्च्यांच्या व्हायरल व्हिडीओवरून डिवचलं
तोपर्यंत बिनविरोध नगरसेवकांवर स्थगिती कायम ठेवावी; अविनाश जाधवांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या तातडीची सुनावणी
तोपर्यंत बिनविरोध नगरसेवकांवर स्थगिती कायम ठेवावी; अविनाश जाधवांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या तातडीची सुनावणी
Embed widget