एक्स्प्लोर
Advertisement
आता फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नका, शरद पवारांचं मोहिते-पाटलांवर टीकास्त्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोहिते-पाटील यांच्यावर नातेपुतेमधील सभेत वैयक्तिक पातळीवर टीका केली आहे.
पंढरपूर : आता फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नका, नाहीतर सहकारमहर्षींना काय वाटेल? अशा शब्दात शरद पवार यांनी मोहिते पाटलांवर टोकाची टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोहिते पाटील यांच्यावर नातेपुते येथील सभेत वैयक्तिक पातळीवर टीका केली आहे.
अकलूजचा दहशतवाद हा गल्लीबोळातला दहशतवाद असून तो संपवण्यासाठी मी तुमच्या भागात आमदाराप्रमाणे काम करेन असा शब्दही सभेवेळी शरद पवार यांनी दिला. आपल्या जुन्या सहकाऱ्यांवर कधी आकसाने बोलणार नाही म्हणत पवारांनी विजय शुगर आणि सुमित्रा पतसंस्थांच्या घोटाळ्याबाबत अनेक तक्रारी असल्याचे सांगून थेट मोहिते पिता-पुत्रावर टीका केली.
मोहिते-पाटील यांना इतकी वर्षे सत्ता दिली त्यावेळी कृष्णा भीमा स्थिरीकरणाबाबत काम करायचा विचार यांच्या डोक्यात कसा आला नाही असा सवालही पवारांनी यावेळी विचारला. मोहिते पाटील यांना रणजीतला सत्ता द्यायची होती, आम्ही विधानपरिषदेवर आमदारकी आणि नंतर राज्यसभेतली खासदारकी दिली. मात्र जिल्ह्यात फिरुन इतर तालुक्यात याने उद्योग सुरु केल्याच्या तक्रारी आल्याने त्यांना लोकसभेला नाकारले असंही शरद पवार यांनी सांगितलं.
मोहिते पाटलांचा हा पोरगा कधी मुख्यमंत्री, तर कधी गिरीश महाजन यांच्या घरासमोर तासनतास उभा राहू लागला. इतकी वर्ष सत्ता भोगलेल्याला असे इतरांच्या दारात उभे राहणे शोभते का असा सवाल पवार यांनी केला.
आमचे ठरलंय असे म्हणत संजय शिंदे यांना निवडून आणायची शपथ पवारांनी उपस्थिताना दिल्याने माढ्याची जागा अडचणीत आल्याचे दिसून आल्याचं चित्र आहे.
दरम्यान साध्वी प्रज्ञा सिंग हीने केलेल्या शहीद करकरे यांच्याबाबतच्या विधानाचा तीव्र निषेध शरद पवारांनी केला. राष्ट्रीयत्वाबाबत बोलण्याचा आता एका राष्ट्रीय पक्षाला कवडीचा अधिकार राहिला नसल्याचे सांगत पवारांनी भाजपचा निषेध केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement