एक्स्प्लोर

ज्या गावात जितका लीड त्या गावात तितकी झाडे लावणार, शेकापच्या युवा आमदाराचा स्तुत्य उपक्रम 

Sangola: आमदार होताच सांगोल्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुखांनी एका स्तुत्य उपक्रमाची घोषणा केली आहे. ज्या गावात जितका लीड त्या गावात तितकी झाडे लावणार असल्याच्या उपक्रमाची घोषणा त्यांनी केली आहे.

Babasaheb Deshmukh Sangola Vidhansabha : विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) यावेळी सांगोला विधानसभा (Sangola Vidhansabha) मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली. कारण या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून आमदार शहाजीबापू पाटील निवडणूक लढवत होते. तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून दीपकआबा साळुंखे पाटील तर शेकापकडून डॉ. बाबासाहेब देशमुख निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, यामध्ये अखेर शेकापच्या बाबासाहेब देशमुखांनी (Babasaheb Deshmuk) मैदान मारलं आहे. आमदार होताच बाबासाहेब देशमुखांनी मोठ्या आणि स्तुत्य उपक्रमाची घोषणा केली आहे. 

बाबासाहेब देशमुखांच्या उपक्रमाचे कौतुक

बाबासाहेब देशमुख यांनी विजयी होताच, ज्या गावात जितका लीड त्या गावात तितकी झाडे लावणार असल्याच्या उपक्रमाची घोषणा केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे. त्यामुळं झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यासाठी त्यांनी हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. बाबासाहेब देशमुख यांनी प्रथमच  विधानसभा निवडणूक लढवली. यामध्ये ते विजयी झाले आहेत. 

गड पुन्हा केला काबीज

सांगोला हा शेकापचा गड आहे. तब्बल 11 वेळा या मतदारसंघाचे नेतृत्व दिवंगत गणपतराव देशमुख यांनी केलं होतं. मात्र, 2019  च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचा हा गड ढासळला होता. शिवसेनेचे शहाजीबापू पाटील हे या मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र, आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा शेकापनं आपला सांगोल्याचा गड काबीज केला आहे. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शहाजीबापू पाटील यांना तब्बल 25 हजार 386 मतांनी चितपट करत विजय मिळविला आहे. बाबासाहेब देशमुख यांनी गेल्या निवडणुकीत झालेल्या डॉ. अनिकेत देशमुख यांच्या पराभवाचे उठ्ठे काढले आहे. सांगोला विधानभा मतदारसंघात डॉ. बाबासाहेब देशमुख यांना (शेकाप) 1 लाख 16 हजार 256, तर त्यांचे विरोधक ॲड. शहाजीबापू पाटील (शिवसेना शिंदे गट) यांना 90 हजार 870 मते पडली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दीपक साळुंखे यांना 50 हजार 962 मते मिळाली आहेत.

अटीतटीच्या लढतीत बाबासाहेब देशमुखांनी लाल बावटा फडकवला 

दरम्यान, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या काही लढतींपैकी सांगोला विधानसभा मतदारसंघाची एक लढत होती. अत्यंत अटीतटीची ही लढत मानली जात होती. मात्र, अखेर बाबासाहेब देशमुखांनी या मतदारसंघात बाजी मारली आहे. महाविकास आघाडीकडून सांगोल्याची जागा शेकाप पक्षाला सुटेल अशी अपेक्षा होती. मात्र, महाविकास आघाडीतून ही जागा शिवसेना ठाकेर गटाला सुटली. त्यामुळं बाबासाहेब देशमुख यांनी देखील निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं सांगोल्यात आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळालं होते. याचा फायदा शहाजीबापू पाटील यांना होणार का? असी देखील मतदारसंघात चर्चा होती. मात्र अखेर बाबासाहेब देशमुखांनी विजय मिळवत शेकापचा लाल बावटा फडकवला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

MLA List Maharashtra 2024 : महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी 2024, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: बदलापूर अत्याचाराची मालाडमध्ये पुर्नरावृत्ती; शाळेतील शिपायाकडून पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत गैरवर्तन, पालकांवर दमदाटी, घटनेविरोधात संतापाची लाट
बदलापूर अत्याचाराची मालाडमध्ये पुर्नरावृत्ती; शाळेतील शिपायाकडून पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत गैरवर्तन, पालकांवर दमदाटी, घटनेविरोधात संतापाची लाट
Vijay Lakshami Bidri on Congress : पक्षातील वाद शमवण्याऐवजी काँग्रेस नेत्यांची प्रशासनावर नाहक टीका?; नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी चांगलचं सुनावलं, म्हणाल्या...
पक्षातील वाद शमवण्याऐवजी काँग्रेस नेत्यांची प्रशासनावर नाहक टीका?; नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी चांगलचं सुनावलं, म्हणाल्या...
Sunetra Pawar Baramati ZP Election 2026: अजितदादांशिवाय पहिल्यांदाच सुनेत्रा वहिनी मतदानाला पोहोचल्या, अजित पवारांची 'ती' परंपरा पाळली
अजितदादांशिवाय पहिल्यांदाच सुनेत्रा वहिनी मतदानाला पोहोचल्या, अजित पवारांची 'ती' परंपरा पाळली
Mumbai : मुंबईत मराठी फेरीवाल्यांसाठी मनसे रस्त्यावर उतरली, दहिसरमध्ये मध्यरात्री आंदोलन; भाजप नेत्यावर गंभीर आरोप
मुंबईत मराठी फेरीवाल्यांसाठी मनसे रस्त्यावर उतरली, दहिसरमध्ये मध्यरात्री आंदोलन; भाजप नेत्यावर गंभीर आरोप

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News: बदलापूर अत्याचाराची मालाडमध्ये पुर्नरावृत्ती; शाळेतील शिपायाकडून पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत गैरवर्तन, पालकांवर दमदाटी, घटनेविरोधात संतापाची लाट
बदलापूर अत्याचाराची मालाडमध्ये पुर्नरावृत्ती; शाळेतील शिपायाकडून पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत गैरवर्तन, पालकांवर दमदाटी, घटनेविरोधात संतापाची लाट
Vijay Lakshami Bidri on Congress : पक्षातील वाद शमवण्याऐवजी काँग्रेस नेत्यांची प्रशासनावर नाहक टीका?; नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी चांगलचं सुनावलं, म्हणाल्या...
पक्षातील वाद शमवण्याऐवजी काँग्रेस नेत्यांची प्रशासनावर नाहक टीका?; नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी चांगलचं सुनावलं, म्हणाल्या...
Sunetra Pawar Baramati ZP Election 2026: अजितदादांशिवाय पहिल्यांदाच सुनेत्रा वहिनी मतदानाला पोहोचल्या, अजित पवारांची 'ती' परंपरा पाळली
अजितदादांशिवाय पहिल्यांदाच सुनेत्रा वहिनी मतदानाला पोहोचल्या, अजित पवारांची 'ती' परंपरा पाळली
Mumbai : मुंबईत मराठी फेरीवाल्यांसाठी मनसे रस्त्यावर उतरली, दहिसरमध्ये मध्यरात्री आंदोलन; भाजप नेत्यावर गंभीर आरोप
मुंबईत मराठी फेरीवाल्यांसाठी मनसे रस्त्यावर उतरली, दहिसरमध्ये मध्यरात्री आंदोलन; भाजप नेत्यावर गंभीर आरोप
U19 World Cup : मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी आज मतदान
ZP Elections LIVE: जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात, सुनेत्रा पवार मतदान केंद्रावर
Multibagger Stock : थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, जाणून घ्या
थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
Embed widget