एक्स्प्लोर

Sakri Vidhan Sabha Election Result 2024 : साक्री मतदारसंघाच्या तिरंगी लढतीत मंजुळा गावित विजयी, चौरे, सूर्यवंशींना चारली पराभवाची धूळ

Sakri Vidhan Sabha Election Result 2024 : 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत मंजुळा गावित यांनी मोहन सूर्यवंशी यांचा 7 हजार 265 मतांच्या फरकाने पराभव करत विजय मिळवला होता. 

Sakri Vidhan Sabha Constituency : धुळे (Dhule) जिल्ह्यातील साक्री हा आदिवासी बहुल राखीव मतदार संघ आहे. काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला म्हणून हा मतदार संघ ओळखला जातो. मात्र साक्री विधानसभा मतदारसंघात (Sakri Vidhan Sabha Constituency) 2019 च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार मंजुळा गावित यांनी बाजी मारली होती. यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघात तिरंगी लढत झाली. महायुतीतून (Mahayuti) शिवसेना शिंदे गटाकडून (Shivsena Shinde Group) मंजुळा गावित (Manjula gavit), महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) काँग्रेसचे उमेदवार प्रवीण चौरे (Pravin Chaure) आणि भाजपमधून बंडखोरी केलेले मोहन सूर्यवंशी (Mohan Suryawanshi) यांच्यात सामना रंगला होता.  या लढतीत मंजुळा गावित 5 हजार 584 मतांनी विजयी झाल्या आहेत.

साक्री विधानसभा मतदारसंघाची जागा आतापर्यंत 8 वेळा काँग्रेसनी जिंकली आहे. 1951 मध्ये अस्तित्वात आलेल्या या विधानसभेच्या जागेवर 1972 ते 1980 पर्यंत सलग तीन वेळेस काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले. मात्र, त्यानंतर पुढील तीन निवडणुकांमध्ये या जागेवर भाजपची सत्ता राहिली. यानंतर 1999 च्या निवडणुकीत बीबीएम पक्षाने अनपेक्षितपणे ही जागा काबीज केली होती. यानंतर, 2004, 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसने पुनरागमन केले आणि सलग तीन वेळा ही जागा जिंकली. परंतु 2019 च्या निवडणुकीत विजयाची मोहीम काँग्रेसला सुरू ठेवता आली नाही.2019 च्या निवडणुकीत भाजपचे मोहन सूर्यवंशी आणि काँग्रेसचे धनाजी अहिरे यांच्यात मुख्य लढत झाली होती. मात्र, अपक्ष उमेदवार मंजुळा गावित यांनी काँग्रेस आणि भाजपला मोठा धक्का दिला होता. मंजुळा गावित यांनी मोहन सूर्यवंशी यांचा 7 हजार 265 मतांच्या फरकाने पराभव करत विजय मिळवला होता. 

साक्री विधानसभेत मंजुळा गावित विजयी

यंदाच्या निवडणुकीत साक्रीची जागा जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष सर्वतोपरी प्रयत्न केले. याशिवाय इतर पक्षांनी देखील आपली पूर्ण ताकद लावण्याचा प्रयत्न केला. मागील निवडणुकीत अपक्ष लढलेल्या मंजुळा गावित यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर काँग्रेसकडून प्रवीण चौरे मैदानाच्या आखाड्यात होते. तर महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाला गेल्याने भाजपचे मोहन सूर्यवंशी यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी निवडणुकीच्या रिंगणात उतरले. या तिरंगी लढतीत मंजुळा गावित यांनी बाजी मारली. मंजुळा गावित यांच्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. 

आणखी वाचा 

Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : धुळे शहर मतदारसंघात तिरंगी लढत, एमआयएमसमोर ठाकरे गट, भाजपचे आव्हान, कोण मारणार बाजी? 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget