एक्स्प्लोर
'56 इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं', अभिनेता रितेश देशमुखची मोदींवर टीका, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
"तुमच्या खिशात असलेला मोबाईल काँग्रेसने दिला आहे, लातूरमध्ये मोबाईल सेवा साहेबांनी आणली आहे. तसेच भारताला स्वातंत्र्य मिळालं ही देखील काँग्रेसचीच देण आहे", असं या व्हिडीओत रितेश सांगताना दिसत आहे.
मुंबई : '56 इंचाची छाती' या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर टीका करणारा अभिनेता रितेश देशमुखचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढलेला असताना रितेशचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या समर्थकांकडून मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.
रितेशचा हा व्हिडीओ लातूर येथील काँग्रेसच्या एका सभेचा असल्याचं बोललं जात आहे. "56 इंचाची छाती आहे असं ते सांगतात. 56 इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं. देश चालवायला 56 इंचाची छाती नाही चांगलं हृदय लागतं, हे प्रियंका गांधींचं वाक्य मला आठवतं", असं रितेश या व्हिडीओत म्हणाताना दिसतो.
या भाषणात काँग्रेस सरकारनं केलेल्या कामाची आठवणही रितेशनं करुन दिली आहे. "तुमच्या खिशात असलेला मोबाईल काँग्रेसने दिला आहे, लातूरमध्ये मोबाईल सेवा साहेबांनी आणली आहे. तसेच भारताला स्वातंत्र्य मिळालं ही देखील काँग्रेसचीच देण आहे", असं या व्हिडीओत रितेश सांगताना दिसत आहे.
व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement